Medicine Storage Tips : घरात औषधे कुठे ठेवू नयेत? जाणून घ्या योग्य पद्धत

Published : Oct 16, 2026, 04:15 PM IST

घरात ताप, डोकेदुखीसाठी आपण औषधे आणून ठेवतो. पण ती नेमकी कुठे आणि कशी ठेवायची, हे अनेकांना माहीत नसतं.

PREV
16
योग्य जागी आणि योग्य तापमानात ठेवणं गरजेचं

घरात अचानक लागल्यास म्हणून आपण ताप, खोकल्याची औषधे आणि गोळ्या आणून ठेवतो. पण फक्त औषधे विकत आणून आपली जबाबदारी संपत नाही. त्यांना योग्य जागी आणि योग्य तापमानात ठेवणं खूप गरजेचं असतं. जास्त उष्णता, ओलावा आणि थेट सूर्यप्रकाशामुळे काही औषधांचा दर्जा आणि परिणामकारकता कमी होऊ शकते.

26
थंड, कोरड्या जागी औषधं ठेवा

चुकीच्या जागी औषधे ठेवल्यास त्यांचा हवा तसा परिणाम होत नाही. त्यामुळे औषधांच्या पाकिटावर दिलेल्या सूचनांचे नेहमी पालन करा. औषधे शक्यतो थंड आणि कोरड्या जागी ठेवावीत. स्वयंपाकघरात उष्णता आणि ओलावा जास्त असतो, त्यामुळे गॅसशेजारी औषधे ठेवू नका. तसेच, बाथरूममधील ओलाव्यामुळेही औषधे खराब होऊ शकतात. खिडकीजवळ, ऊन येणाऱ्या कपाटात किंवा गच्चीवर औषधे ठेवणे टाळा.

36
काही औषधं फ्रिजमध्ये ठेवायची असतात

सगळीच औषधे एकाच पद्धतीने ठेवता येत नाहीत, हे लक्षात घ्या. बहुतांश गोळ्या आणि कॅप्सूल सामान्य तापमानात (रूम टेम्परेचर) ठेवता येतात. पण काही इंजेक्शन्स, जैविक औषधे आणि डोळ्यांचे ड्रॉप्स फ्रिजमध्ये ठेवणं आवश्यक असतं. कोणतं औषध कसं ठेवायचं, हे त्याच्या पाकिटावरील सूचना वाचून समजून घ्या. फ्रिजमध्ये ठेवायची औषधे चुकूनही बर्फाच्या कप्प्यात (फ्रीजर) ठेवू नका.

46
काही शंका असल्यास डॉक्टर, फार्मासिस्टला विचारा

फ्रिजच्या दरवाजात तापमान सतत बदलत असतं, त्यामुळे तिथे औषधे ठेवण्याऐवजी ती आतल्या योग्य कप्प्यात ठेवा. काही शंका असल्यास डॉक्टर किंवा फार्मासिस्टचा सल्ला घ्या. औषधांचा रंग, वास, आकार किंवा स्वरूपात काही वेगळा बदल दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. गोळ्या एकमेकांना चिकटणे किंवा औषधाच्या रंगात बदल होणे, याकडे लक्ष द्या. असे बदल दिसल्यास औषध वापरण्यापूर्वी फार्मासिस्टला नक्की विचारा.

56
एक्सपायरी डेट आधी तपासूनच औषधं खा

औषधे साठवताना त्यांची एक्सपायरी डेट (कालबाह्य तारीख) तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. घरातील औषधे वेळोवेळी तपासा आणि एक्सपायर झालेली औषधे वेगळी काढून ठेवा. लहान मुले असलेल्या घरात औषधे त्यांच्या हाताला लागणार नाहीत अशा कुलूपबंद कपाटात ठेवा. औषधे त्यांच्या मूळ पाकिटातच ठेवा, जेणेकरून त्यांचे नाव आणि वापरण्याच्या सूचना स्पष्ट दिसतील. एक्सपायर झालेली औषधे कचऱ्यात, टॉयलेटमध्ये किंवा गटारात फेकून देऊ नका. जवळ एखादे मेडिसिन कलेक्शन सेंटर असल्यास तिथे ती जमा करा.

66
महत्त्वाच्या सवयी फायद्याच्या ठरतील

औषधांची सुरक्षित विल्हेवाट कशी लावायची, याबद्दल फार्मासिस्टला विचारून घ्या. प्रवासात जर तुम्हाला थंड ठेवायची औषधे न्यायची असतील, तर त्यांचे तापमान कसे टिकवून ठेवायचे, हे डॉक्टरांकडून समजून घ्या. औषधे योग्य प्रकारे साठवणे, त्यांची एक्सपायरी डेट तपासणे आणि ती लहान मुलांपासून दूर ठेवणे, या छोट्या पण महत्त्वाच्या सवयी तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवतील.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories