Republic Day Speech in Marathi : प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत, महाविद्यालयात देण्यासाठी सोपी भाषणे

Published : Jan 21, 2026, 11:30 AM IST

Republic Day Speech in Marathi : प्रजासत्ताक दिन हा संविधान, लोकशाही आणि नागरिकांच्या कर्तव्यांची आठवण करून देणारा दिवस आहे. विद्यार्थ्यांनी चांगले नागरिक बनून देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा संकल्प करणे हाच या दिवसाचा खरा अर्थ आहे.

PREV
14
प्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक दिन हा भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान अंमलात आले आणि भारत एक सार्वभौम, लोकशाही, प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून ओळखला जाऊ लागला. या दिवशी देशाच्या कारभाराची सूत्रे जनतेच्या हातात आली आणि प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळाले. म्हणूनच दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या भावनेने साजरा केला जातो. यंदा देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जाणार आहे. यानिमित्त शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती निर्माण करण्यासाठी काही भाषणे पाहा. 

24
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सोपे भाषण

आदरणीय प्रमुख पाहुणे, माननीय शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत, हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी भारताचे संविधान लागू झाले आणि सर्व नागरिकांना समान अधिकार मिळाले. आपले संविधान आपल्याला स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता शिकवते.

आपल्या देशासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले आहे. त्यांच्या त्यागामुळेच आज आपण मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकतो. आपण विद्यार्थी म्हणून चांगले शिक्षण घेऊन, प्रामाणिक नागरिक बनणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. चला, आपण सर्वजण एकत्र येऊन आपल्या देशाचा अभिमान वाढवूया. जय हिंद! जय भारत!

34
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रभावी भाषण

आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या मित्रांनो, प्रजासत्ताक दिन म्हणजे केवळ एक उत्सव नाही, तर लोकशाहीची ताकद दाखवणारा दिवस आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपण स्वतःचे संविधान स्वीकारले आणि देशाच्या कारभाराची सूत्रे जनतेच्या हातात दिली. हे संविधान आपल्याला अधिकार देते, पण त्याचबरोबर जबाबदाऱ्यांची जाणीवही करून देते.

आजचा युवा वर्गच उद्याचा भारत घडवणार आहे. भ्रष्टाचार, अन्याय आणि असमानतेविरोधात उभे राहून देशासाठी काम करणे हेच आपल्या प्रजासत्ताक दिनाचे खरे उद्दिष्ट आहे. चला, आपण सर्वजण संविधानाची मूल्ये जपू आणि देशाच्या प्रगतीसाठी योगदान देऊया. जय हिंद!

44
लहान मुलांसाठी अतिशय छोटे भाषण

नमस्कार सगळ्यांना, आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. हा दिवस आपल्याला देशावर प्रेम करायला शिकवतो. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक वीरांनी बलिदान दिले आहे. आपण मोठे होऊन चांगले नागरिक बनूया आणि भारताचा नावलौकिक वाढवूया. जय हिंद!

Read more Photos on

Recommended Stories