Navratri 2023 Ghatasthapana : नवरात्रोत्सवास 15 ऑक्टोबरपासून सुरुवात, जाणून घ्या घटस्थापनेचा शुभ मुहूर्त व या उत्सवामागील कथा

Navratri 2023 : नवरात्रोत्सवास कधीपासून होतेय सुरुवात? कोणत्या मुहूर्तावर करावी घटस्थापना, जाणून घ्या सविस्तर माहिती…

Harshada Shirsekar | Published : Oct 14, 2023 8:59 AM IST / Updated: Oct 14 2023, 02:33 PM IST

Navratri 2023 Ghatasthapana Date and Time : शारदीय नवरात्रारंभ 15 ऑक्टोबरपासून होत आहे. शारदीय नवरात्रीचा उत्सव अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून नवमीपर्यंत साजरा केला जातो. उत्सवाच्या या नऊ दिवसांमध्ये देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. 

नवरात्रोत्सवाच्या (Navratri 2023 Colours With Date) पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना (Navratri 2023 Ghatasthapana Muhurat) करण्याचे मोठे महत्त्व आहे. यावर्षी नवरात्रोत्सवास कधीपासून सुरुवात होत आहे? कोणत्या मुहूर्तावर घटस्थापना करावी? जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती…

शारदीय नवरात्रोत्सव : घटस्थापनेचा मुहूर्त (Navratri 2023 Kalash Sthapana Shubh Muhurat)

यंदा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणारा नवरात्रोत्सव 24 ऑक्टोबरपर्यंत साजरा केला जाणार आहे.

अभिजीत मुहूर्त : सकाळी 11 वाजून 49 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजून 36 मिनिटांपर्यंत

कलश स्थापना कशी करावी? (Navratri 2023 Kalash Sthapana Mantra-Vidhi)

VIDEO : कुमारिका पूजन कसे करावे? या गोष्टी ठेवा लक्षात 

नवरात्रोत्सव का साजरा केला जातो? जाणून घ्या यामागील कहाणी (Navratri Utsav 2023 Ka Sajara Kela Jato?) (Why Do We Celebrate Navratri)

देवी पुराणातील माहितीनुसार, महिषासूर नावाचा एक राक्षस होता. तपश्चर्येच्या जोरावर वरदान मिळाल्यानंतर त्याने देवतांना त्रास देण्यास सुरुवात केली आणि स्वर्गाचाही ताबा घेतला. त्यावेळेस सर्व देवता भगवान शंकर, विष्णू आणि ब्रह्मदेवाकडे गेले. 

यावेळेस या त्रिदेवांनी सांगितले की, 'तुम्ही सर्व देवांनी आदिशक्तीचे आवाहन करा. या राक्षसाचा नाश करण्यास ती एकटीच समर्थ आहे.' यानंतर सर्व देवतांनी मिळून आदिशक्तीचे आवाहन केले. सर्व देवांनी आपली शस्त्रे देवीला अर्पण केली. 

देवांकडून शस्त्रे मिळाल्यानंतर देवीने महिषासुराला आव्हान दिले. देवी आणि महिषासुरामधील युद्ध नऊ दिवस सुरू होते. दहाव्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला. नऊ दिवस चाललेल्या या युद्धामुळे नवरात्रोत्सव (Navratri 2023) साजरा करण्याची परंपरा सुरू झाली, ही परंपरा आजही जपली जाते.

आणखी वाचा : 

नितळ व चमकदार त्वचेसाठी वापरा हे आयुर्वेदिक फेस पॅक

Bosu Ball Exercises : बोसू बॉल एक्सरसाइज माहितीये? जाणून घ्या सविस्तर माहिती

Health Benefits Of Banana Leaf : केळीच्या पानावर जेवण्याचे फायदे माहितीयेत? मिळतील इतके अद्भुत लाभ

Share this article