Health tips : मनुका खाणे कोणत्या लोकांसाठी खूप फायदेशीर, वाचा सविस्तर

Published : May 29, 2024, 07:00 AM IST
image of kishmish

सार

सुक्या मेव्यातील मनुके खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.आज आपण रिकाम्या पोटी मनुके खाल्ल्याने पोट आणि शरीर दोन्हीसाठी काय फायदे होतात याबद्दल बोलणार आहोत. ज्या लोकांना शरीरात अशक्तपणा आहे त्यांना मनुका खाण्याचा सल्ला दिला जातो. 

आरोग्याविषयी जागरूकता सध्या अत्यंत वाढली आहे. याला कारण देखील बदलती जीवनशैली आहे हे ही तेवढच सत्य आहे. उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कोणतीच वेळ बरोबर नसल्याने अनेक आजारांनी अनेकांना ग्रासले आहे. यासाठी जनजागृती देखील आवश्यक आहेच. तर आज आपण सुक्या मेव्यातील मनुके खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.आज आपण रिकाम्या पोटी मनुके खाल्ल्याने पोट आणि शरीर दोन्हीसाठी काय फायदे होतात याबद्दल बोलणार आहोत. ज्या लोकांना शरीरात अशक्तपणा आहे त्यांना मनुका खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण त्यात अनेक अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असतात. या सर्वांशिवाय त्यात लोह आणि जीवनसत्त्वेही मुबलक प्रमाणात असतात. जे तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे.

मनुक्यातील पोषक तत्वे :

सुक्या मेव्यांबद्दल बोलायचे झाले तर, गोड चवीच्या मनुक्यात भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात. यामध्ये फायबर, लोह, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, बी6 सारखे अनेक घटक असतात.जे आरोग्याला अत्यंत गरजेचे आहेत.

अशक्तपणामध्ये फायदेशीर मनुके :

ॲनिमिया म्हणजेच रक्ताच्या कमतरतेचा त्रास असेल तर अश्या रुग्णाला डॉक्टर मनुके खाण्याचा सल्ला आवरजून देतात. या आजारापासून त्रस्त असलेल्या व्यक्तींनी रोज मनुके खावे कारण यामुळे हिमोग्लोबिनची निर्मिती वाढण्यास मदत होते.

उच्च रक्तदाब :

हाय बीपीच्या रुग्णांनी रिकाम्या पोटी मनुका खाल्ल्यास त्यांना अत्यंत फायदेशीर आहे. वास्तविक, त्यात पोटॅशियम आणि फायबरचे प्रमाण चांगले असते. जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. तसेच, त्यात अनेक प्रकारचे पॉलिफेनॉल असतात जे पोटात नायट्रिक अ‍ॅसिडसारखे काम करतात. यासोबतच हे बीपी नियंत्रणासाठीही उत्तम आहे.

पचनक्रिया व्यवस्थित करते :

जर तुम्हाला ऍसिडिटी किंवा इतर पचन संस्थेचा काही त्रास असले तर, तुम्ही रोज उपाशी पोटी मनुके खाल्यास तुमची पचन संस्था सुधारेल आणि पोटाचे विकार देखील कमी होईल. याच बरोबर तुमची ऍसिडिटीचा त्रास कायमस्वरूपी कमी होईल.

आणखी वाचा :

काय सांगताय घरी बनवलेले जेवण देखील हानिकारक ? वाचा ICMR सांगितलेल्या नियमावली

Kitchen Hacks : कैरी-पुदिन्याची चटणी तयार केल्यानंतर काळी पडते? ट्राय करा ही ट्रिक

सनस्क्रिन लोशन खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा होईल मोठे नुकसान

PREV

Recommended Stories

Aqua Workout : अ‍ॅक्वा वर्कआउट नक्की काय प्रकार आहे? वजन कमी करणे ते हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
Weekly Horoscope : चंद्र कर्क ते तूळ राशीत भ्रमण करेल, या लोकांसाठी आठवडा लाभदायी, तर या राशींनी रागावर नियंत्रण ठेवावे!