
नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी काहीतरी चटपटीत आणि चविष्ट बनवायचे असेल, तर एग्ग पॉप्स हा उत्तम पर्याय आहे. कमी वेळेत आणि घरातील मोजक्या साहित्यापासून तयार होणारा हा पदार्थ मुलांसह मोठ्यांनाही नक्कीच आवडेल.
साहित्य
४ उकडलेली अंडी
१ लहान कांदा
२ हिरव्या मिरच्या
१ लहान गाजर
बारीक चिरलेली कोथिंबीर आवश्यकतेनुसार
बारीक चिरलेली पुदिन्याची पाने आवश्यकतेनुसार
१ टीस्पून चिली फ्लेक्स
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून चिकन मसाला
चवीनुसार मीठ
१०० ग्रॅम बेसन
२ अंडी
रस्क पावडर आवश्यकतेनुसार
तळण्यासाठी रिफाइंड तेल
सर्व्ह करण्यासाठी शेजवान चटणी
कृती
उकडलेली अंडी आणि गाजर किसून एका बाऊलमध्ये एकत्र घ्या. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पुदिन्याची पाने, चिली फ्लेक्स, लाल तिखट, मीठ, चिकन मसाला आणि बेसन घाला. सगळं नीट मिक्स करा. मिश्रणाला हलक्या हाताने तुम्हाला हवा तसा आकार द्या. जर आकार येत नसेल, तर एक किंवा दोन चमचे पाणी घालून मिक्स करा. जास्त पाणी घालू नका. दोन अंडी पाव चमचा मीठ घालून फेटून घ्या. आता तयार केलेले पीस एकामागून एक फेटलेल्या अंड्यामध्ये बुडवा आणि त्यावर रस्क पावडरचा थर द्या. तेल गरम करा आणि एकाच वेळी तीन किंवा चार पीस सोनेरी तपकिरी रंगाचे होईपर्यंत तळा. तयार आहेत! गरमागरम एग्ग पॉप्स शेजवान चटणीसोबत सर्व्ह करा.