बटाटा आपल्यापैकी अनेकांची आवडती भाजी आहे. पण डायबिटीजच्या रुग्णांनी बटाटा खाणे चांगले आहे का?
बटाट्यामध्ये स्टार्च आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात.
बटाट्यात स्टार्च जास्त असल्याने, शरीर त्याचे ग्लुकोजमध्ये विघटन करते. यामुळे रक्तातील साखर वाढते.
बटाट्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) देखील जास्त असतो.
मधुमेहाच्या रुग्णांनी बटाटा खाणे शक्यतो टाळावे किंवा कमी प्रमाणात खावे.
बटाट्याच्या अतिसेवनामुळे शरीराचे वजन वाढू शकते.
मधुमेहींनी बटाट्याऐवजी आहारात रताळ्याचा समावेश करणे अधिक चांगले आहे. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी असतो आणि त्यात स्टार्चही कमी असतो.
Rameshwar Gavhane