परफ्यूमवर EDT, EDP आणि EDC असे का लिहिलेले असते?, खरेदीपूर्वी घ्या जाणून

Published : Jul 22, 2025, 04:00 PM IST
Perfume Buying Tips

सार

परफ्यूम लावणे प्रत्येकालाच आवडते. यामुळे चारचौघांमध्ये तुमचे व्यक्तीमत्व उठून दिसण्यासह आत्मविश्वासही वाढला जातो. पण परफ्यूम खरेदी करण्यापूर्वी त्यावर लिहिलेल्या कोडबद्दल तुम्हाला माहिती असावे. 

Perfume Buying Tips : परफ्यूम खरेदी करताना आपण अनेकदा बाटलीवर EDT, EDP किंवा EDC अशा अक्षरांची नोंद पाहतो. हे शॉर्टकट्स फक्त परफ्यूमची नावे नसून त्या परफ्यूममध्ये सुगंधी तेलाचे प्रमाण, टिकण्याची वेळ आणि तीव्रतेबाबत माहिती देतात. हे इंग्रजी शब्द Eau de Toilette (EDT), Eau de Parfum (EDP) आणि Eau de Cologne (EDC) या फ्रेंच मूळ असलेल्या प्रकारांचे लघुरूप आहेत. या प्रकारांबाबत पुढे सविस्तर जाणून घेऊया. 

Eau de Parfum (EDP) – दीर्घकाळ टिकणारा सुगंध

Eau de Parfum म्हणजे EDP मध्ये सुगंधी तेलाचे प्रमाण सुमारे १५% ते २०% दरम्यान असते. त्यामुळे याचा सुगंध तुलनेने अधिक तीव्र, खोल आणि दीर्घकाळ टिकणारा असतो. एकदा वापरल्यावर हा परफ्यूम ६ ते ८ तासांपर्यंत राहतो. त्यामुळे विशेष कार्यक्रम, लग्न समारंभ किंवा ऑफिससाठी EDP योग्य पर्याय मानला जातो. याचे दर थोडे जास्त असतात, पण टिकाऊपणामुळे किंमत वसूल होते.

Eau de Toilette (EDT) – रोजच्या वापरासाठी योग्य

EDT म्हणजे Eau de Toilette मध्ये सुगंधी घटक ८% ते १२% दरम्यान असतो. हा परफ्यूम EDP पेक्षा थोडा हलका असतो आणि याचा सुगंध सुमारे ४ ते ६ तास टिकतो. याची किंमतही थोडीशी कमी असते. EDT रोजच्या वापरासाठी किंवा ऑफिस, कॉलेजसाठी योग्य पर्याय मानला जातो. विशेषतः उन्हाळ्यात हलका आणि फ्रेश सुगंध हवा असल्यास EDT परफ्यूम उत्तम ठरतो.

Eau de Cologne (EDC) – सौम्य आणि अल्पकाळ टिकणारा

Eau de Cologne म्हणजे EDC हा सर्वात हलका प्रकार असून यामध्ये फक्त २% ते ५% सुगंधी तेलाचे प्रमाण असते. त्यामुळे हा परफ्यूम फक्त २ ते ३ तासांपर्यंत टिकतो. याचा सुगंध सौम्य आणि फ्रेश असतो. हे प्रकार प्रामुख्याने पुरुषांसाठी वापरले जातात. कधी-कधी अंघोळीनंतर लगेच वापरण्यासाठी असे परफ्यूम बेस्ट आहे.याच्या किंमतीही कमी असतात. 

EDT, EDP आणि EDC यामधील फरक समजून घ्या

या तिन्ही प्रकारांमध्ये मुख्य फरक आहे. यानुसार सुगंधी तेलाचे प्रमाण, सुगंध टिकण्याचा कालावधी आणि किंमत. तुमच्या गरजेनुसार आणि वातावरणानुसार परफ्यूमची निवड करावी. दिवसभर टिकणारा सुगंध हवा असल्यास EDP योग्य, तर रोजच्या साध्या वापरासाठी EDT किंवा EDC निवडावी.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

सोन्याला टक्कर! २०२६ मध्ये सर्वाधिक ट्रेंडमध्ये राहतील 'हे' ८ इअररिंग्स; फॅशन आयकॉन बनण्यासाठी लगेच पाहा!
रात्री ट्रेन प्रवास करताय?, या ५ महत्त्वाच्या टिप्स तुमच्या प्रवासाचा अनुभव बदलून टाकतील!