10 मिनिटांत तयार करा रव्यापासून पाणीपुरीच्या पुरा, वाचा रेसिपी स्टेप बाय स्टेप

Published : Jan 11, 2025, 11:18 AM IST
Sattvic pani puri recipe for Navratri

सार

पाणीपुरी खाणे सर्वांनाच आवडते. पण घरी पाणीपुरीची रेसिपी तयार करताना काहींच्या नाकीनौ येतात. अशातच घरच्याघरी रव्यापासून झटपट तयार होणाऱ्या पुऱ्या आणि चटणी याची रेसिपी पाहूया.

Pani Puri Recipe Step by Step : पाणीपुरीचे नाव काढल्यानंतर तोंडाला पाणी सुटते. खासकरुन महिलांना पाणीपुरी खाणे फार आवडते. अशातच घरच्याघरी एखाद्या दिवशी पाणीपुरीचा बेत करायचा झाल्यास पाणीपुरीच्या पुऱ्या आणि पाणी कसे तयार करायचे याची रेसिपी स्टेप बाय स्टेप पाहूया.

पाणीपुरीच्या पुरीसाठी सामग्री

  • 250 ग्रॅम बारीक रवा
  • तेल
  • गरम पाणी

कृती

  • सर्वप्रथम रवा तेलात हलका भाजून घ्या.
  • रव्यामध्ये पुन्हा तेल घालून हाताने मळून घ्या.
  • रव्यामध्ये एक कप गरम पाणी घालून त्याचे घट्ट पीठ तयार करा.
  • पीठाचे लहान आकारातील गोळे तयार करा.
  • गॅसवर कढई ठेवून त्यात तेल कडक गरम झाल्यानंतर पीठाचे लहान आकारातील गोळे लांबलच लाटून तेलात डीप फ्राय करा.

हेही वाचा : घरच्या घरी ब्रेकफास्टमध्ये पटकन काय बनवू शकतो, पर्याय जाणून घ्या

पाणीपुरीचे पाणी असे करा तयार

सामग्री

  • पुदीना
  • जीरे पावडर
  • चाट मसाला
  • काळ मीठ
  • आल्याचा तुकडा
  • हिरव्या मिरची
  • लिंबाचा रस
  • कडक बुंदी

कृती

  • सर्वप्रथम मिक्सरमध्ये कोथिंबीर, पुदीना,जीरे पावडर, चाट मसाला, काळ मीठ, आल्याचा तुकडा बारीक वाटून घ्या.
  • पुदीन्याची चटणी तयार झाल्यानंतर गाळणीने त्यामधील पाणी काढा.
  • पुदिन्याच्या पाण्यामध्ये चाट मसाला, कडक बिंदू, कोथिंबीर आणि लिंबाचा रस मिक्स करुन पाणीपुरीसाठी लागणारे तिखट पाणी तयार करा.

 

आणखी वाचा : 

घरच्या घरी पटकन ब्राउनी कशी बनवावी, प्रोसेस जाणून घ्या

सॅंडविच हेल्दी बनवण्याचे सोपे उपाय; शरीराला होईल फायदा व सॅंडविचचा वाढेल स्वाद

PREV

Recommended Stories

भारतातील सर्वाधिक Romantic Honeymoon Destinations, नव्या वर्षात पार्टनरसोबत या फिरून
Browser Extension : ब्राउजर एक्सटेंन्शन वापरताना रहा सावध, 40 लाख युजर्सला उद्भवलाय धोका