OpenAI to Start Testing Ads in ChatGPT : तुम्ही ChatGPT वापरता का? लवकरच तुम्हाला त्यावर जाहिराती दिसू शकतात. OpenAI ने मोफत युझर्ससाठी जाहिरातींची चाचणी सुरू केली आहे. याचा उत्तरांवर परिणाम होईल का? प्रायव्हसीचं काय? संपूर्ण माहिती वाचा.
मोफत सेवा देणारी OpenAI कंपनी आता कमाई वाढवण्यासाठी जाहिराती दाखवणार आहे. यामुळे तुमचा चॅटिंगचा अनुभव बदलेल. लवकरच ChatGPT वापरताना तुम्हाला जाहिराती दिसतील.
25
जाहिराती कोणाला दिसणार?
जाहिराती सर्वांना दिसणार नाहीत.
• मोफत युझर्स: तुम्हाला जाहिराती दिसतील.
• पेड युझर्स (Plus, Pro): यांना जाहिरातमुक्त सेवा मिळत राहील.
35
AI उत्तरांमध्ये बदल होणार का?
OpenAI ने स्पष्ट केले आहे की जाहिरातदारांचा उत्तरांवर कोणताही प्रभाव पडणार नाही. जाहिराती वेगळ्या दिसतील आणि युझर्सची चॅट हिस्ट्री शेअर केली जाणार नाही.
AI तंत्रज्ञान चालवण्याचा खर्च खूप जास्त आहे. त्यामुळे मोफत सेवा सुरू ठेवण्यासाठी जाहिरातींमधून मिळणारी कमाई आवश्यक असल्याचे कंपनीचे मत आहे.
55
लहान व्यावसायिकांना संधी
OpenAI केवळ बॅनर जाहिरातींपुरते मर्यादित राहणार नाही. लहान व्यावसायिकांना AI द्वारे ग्राहकांशी संवाद साधता येईल अशा नवीन जाहिरात पद्धतींवरही कंपनी काम करत आहे.