Published : Jun 27, 2025, 07:19 AM ISTUpdated : Jun 27, 2025, 07:32 AM IST
मुंबई - प्रसिद्ध ज्योतिषी चिराग दारुवाला यांच्या गणनेनुसार आजचा दिवस तुमचा कसा जाईल ते पहा. कोणत्या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीसाठी दिवस चांगला आणि कोणासाठी कठीण. कोणावर राहिल कृपादृष्टी ते जाणून घ्या.
राजकारण्यांच्या मदतीने अडकलेली कामे मार्गी लागतील. आरोग्य चांगले राहील. कामावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढेल. फिटनेसकडे लक्ष द्या. आरोग्य उत्तम असेल तर सर्व कामे उत्तम होतील. आरोग्यच यशाची गुरुकिल्ली आहे असे समजा.
29
अंक २ (२,११,२० आणि २९ तारखेला जन्मलेले लोक)
निकटवर्तीयांसोबत मनोरंजनात दिवस जाईल. कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतात. त्यामुळे सांभाळून राहा. उगाच जुने राग उकरुन काढू नका. पूर्ण शक्तीनिशी भविष्यातील कामांवर लक्ष केंद्रित करा. तुमचा उद्देश काय आहे हे समजून घ्या. त्या दिशेने काम करत राहा. यश निश्चितच मिळेल.
39
अंक ३ (३,१२,२१ आणि ३० तारखेला जन्मलेले लोक)
कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये वेळ जाईल. तो जाऊ द्या. त्यातून भविष्यात सकारात्मक बातमी मिळेल. मतभेद होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. मुलांसोबत वेळ घालवा. मुलांना तुमची संपत्ती समजा. त्यांचा सहवास तुमच्या जीवनात आनंद आणेल.
कोणत्याही कामात घाई करू नका. घाईत केलेल्या कामात अपयश येण्याची शक्यता असते. गॅस आणि पोटाच्या समस्या होऊ शकतात. आरोग्य उत्तम ठेवा. त्यासाठी जरा व्यायाम करा. संयम आणि शांतता राखा. मालमत्ता खरेदी-विक्रीत वेळ जाईल. मित्रांसोबतचे संबंध चांगले राहतील.
59
अंक ५ (५,१४,२३ तारखेला जन्मलेले लोक)
आध्यात्मिक कामांमध्ये रस वाढेल. हा काळ तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबीयांसाठी सकारात्मक राहिल. चालू असलेल्या आरोग्य समस्या दूर होतील. पण त्याची घाई करु नका. हट्ट धरून चुका होऊ शकतात. स्वतःचे वर्तन योग्य ठेवा. तुमच्या वर्तनाकडे इतरांचे लक्ष असेल. त्यात चुका होऊ देऊ नका.
69
अंक ६ (६,१५ आणि २४ तारखेला जन्मलेले लोक)
दिवस चांगला सुरू होईल. आजचा दिवस सकारात्मक आहे. निकटवर्तीयांसोबत वेळ जाईल. कौटुंबिक जीवनात गैरसमज होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. तोंडाला येईल ते बोलू नका. घशाचा संसर्ग आणि खोकला होऊ शकतो. मुलांच्या समस्या सुटतील.
79
अंक ७ (७,१६ आणि २५ तारखेला जन्मलेले लोक)
दिवस सामान्य जाईल. तुम्ही रुटीन फॉलो करताय असे वाटू शकते. शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल. त्यामुळे जरा वेळ शांत पडून राहा. मनातील जळमटे दूर होऊ द्या. घरातील वातावरण बिघडू शकते. पण पती-पत्नीच्या नात्यात सुधारणा होईल. नात्यातील गोडवा वाढले.
89
अंक ८ (८,१७ आणि २६ तारखेला जन्मलेले लोक)
व्यस्ततेत दिवस जाईल. त्यामुळे शारीरिक थकवा जाणवेल. मार्केटिंगच्या कामात वेळ जाईल. हार्मोन्सची समस्या होऊ शकते. त्याचे दैनंदिन शेड्युल योग्य राखण्याचा प्रयत्न करा. भावांशी संबंध गोड राहतील. कौटुंबिक कामात वेळ जाईल.
99
अंक ९ (९,१८ आणि २७ तारखेला जन्मलेले लोक)
मनात आनंद राहील. काही प्रमाणात यश मिळू शकते. महिलांना सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. आरोग्याकडे लक्ष द्या. कोणताही आजार शरीरावर काढू नका. भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. असे निर्णय योग्य नसतात. हातूक चूक होण्याची शक्यता वाढते.