Numerology Prediction July 22 : आज मंगळवारचे अंकशास्त्र भविष्य, पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतात!

Published : Jul 22, 2025, 07:35 AM IST

प्रसिद्ध ज्योतिषी चिराग दारुवाला यांच्या गणनेनुसार आजचा दिवस कसा जाईल ते जाणून घ्या. अंकांनुसार जाणून घ्या तुमचे आजचे भविष्य. कोणाला दिवस चांगले असेल तर कुणाला संकटांचा सामना करावा लागेल. 

PREV
19
अंक १ (१,१०,१९ आणि २८ तारखेला जन्मलेले)

गणेशजी म्हणतात, आज कोणतीही संधी चुकवू नका. चुकविलेली संधी परत येणार नाही. आज पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या चर्चा टाळा. आज कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. कठोर परिश्रम सोडू नका. आजचा दिवस चांगला जाईल.

29
अंक २ (२,११,२० आणि २९ तारखेला जन्मलेले)

गणेशजी म्हणतात, जवळच्या नातेवाईकांसोबत गप्पा आणि धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. त्यामुळे देवांचा आणि थोरामोठ्यांचा आशिर्वाद तुमच्यासोबत असेल. आज घरातील वातावरण आनंदी असेल. घरी चांगला गोष्टी घडतील. सर्व कामात धीर धरा. आज व्यवसायात प्रगती होईल.

39
अंक ३ (३,१२,२१ आणि ३० तारखेला जन्मलेले)

गणेशजी म्हणतात, गुंतवणुकीसाठी चांगला दिवस. पण गुंतवणूक करताना सर्व माहिती घेऊनच निर्णय घ्या. आज मालमत्तेशी संबंधित कामांना गती येईल. कदाचित नवीन मालमत्ता घेण्याचा योग येईल. आज खोकला, तापाची समस्या होऊ शकते. प्रकृतीची काळजी घ्या.

49
अंक ४ (४,१३,२२ आणि ३१ तारखेला जन्मलेले)

गणेशजी म्हणतात, आर्थिक निर्णय घेताना काळजी घ्या. आर्थिक परिस्थिती कमकुवत होऊ शकते. पण घाबरुन जाऊ नका. आज कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला दिवस जाईल. आज अनोळखी व्यक्तीशी भेट होऊ शकते. त्यामुळे आयुष्यात नवचैतन्य आल्याचे दिसून येईल. व्यवसायात प्रगती होईल.

59
अंक ५ (५,१४,२३ तारखेला जन्मलेले)

गणेशजी म्हणतात, कुटुंबातील सदस्य आरामात दिवस घालवतील. त्यांचा तुम्हाला तिटकारा वाटेल. पण तसे होऊ देऊ नका. आज एखादी शुभ बातमी मिळू शकते. जरा धीर धरा. आजचा दिवस चांगला जाईल. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा.

69
अंक ६ (६,१५ आणि २४ तारखेला जन्मलेले)

गणेशजी म्हणतात, कुटुंबातील तरुण आणि मुले त्यांच्या संदर्भात सावधगिरी बाळगा. तुमची काळजी हेच त्यांचे संरक्षण आहे. पती-पत्नीमधील संबंध चांगले राहतील. वैवाहिक सुख मिळेल. आज गुंतवणुकीसाठी चांगला दिवस. आज व्यवसायात प्रगती होईल.

79
अंक ७ (७,१६ आणि २५ तारखेला जन्मलेले)

गणेशजी म्हणतात, आजच्या काळात तुमच्या व्यवसायातील संबंधांवर लक्ष केंद्रित करा. व्यवसाय वाढला तर तुमची आर्थिक प्रगती होईल. व्यवसायाला जास्त वेळ द्या, तुमच्या पदरात यश पडल्याशिवाय राहणार नाही. आज जनसंपर्क सुधारेल.

89
अंक ८ (८,१७ आणि २६ तारखेला जन्मलेले)

गणेशजी म्हणतात, घरात उत्सवाचे वातावरण असेल. सर्वत्र अनंदी आनंद असेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. भांडणे होणार नाहीत. आज कामासोबत आरोग्याची काळजी घ्या. पावसात भिजून आरोग्याची समस्या निर्माण होऊ शकतात.

99
अंक ९ (९,१८ आणि २७ तारखेला जन्मलेले)

गणेशजी म्हणतात, अनुकूल आर्थिक परिस्थितीमुळे आत्मविश्वास आणि मनोबल वाढेल. त्यामुळे आयुष्यात सकारात्मक बदल होतील. दृष्टीकोण सुधारेल. पती-पत्नीमधील संबंध सुधारतील. एकमेकांना सुख मिळेल. आज बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते. आजचा दिवस चांगला जाईल.

Read more Photos on

Recommended Stories