मुंबई - आज जुलै महिन्याचा पहिला दिवस आहे. आजपासून नवीन महिन्याची सुरवात होत आहे. प्रसिद्ध ज्योतिषी चिराग दारुवाला यांच्या गणनेनुसार आजचा दिवस कसा जाईल ते पहा. कोणत्या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीसाठी दिवस चांगला आणि कोणासाठी कठीण आहे ते जाणून घ्या.
अंक १: शुभ बातमी येऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस आहे. शिक्षणात मोठी प्रगती होईल. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस सुख, समृद्धी आणि भरभराटीचा आहे. पण उत्साहाच्या भरात चुकीचे काम करु नका.
29
अंक २: अडकलेल्या कामांना गती मिळेल. प्रलंबित काम झाल्याने तुम्हाला आनंद मिळेल. समाधान लाभेल. कुटुंबासोबत आनंद एन्जॉय कराल. परंतु, राग नियंत्रणात ठेवा. रागाने अनेक गोष्टी नष्ट होतात. आनंदही नष्ट होतो.
39
अंक ३: सवयींबद्दल सावधगिरी बाळगा. आरोग्यात चढ-उतार होईल. प्रकृती नरम गरम राहिल्याने जरा उदासी वाटेल. पण तसे होऊ देऊ नका. उत्साही राहा. हिच नाराजी संपण्याची वेळ आहे. करिअरमध्ये प्रगती होईल.
अंक ४: विद्यार्थ्यांसाठी समस्या सोडवल्या जातील. शैक्षणिक प्रगती होईल. अडलेली वाट मोकळी होईल. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा. व्यवहार करताना काळजी घ्या. अन्यथा नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.
59
अंक ५: आरोग्यात सुधारणा होईल. आत्मविश्वास वाढेल. उत्साह वाढेल. प्रगतीच्या नव्या वाटा सापडली. पैशांमध्ये प्रगती होईल. त्यामुळे नवीन कामे हाती घ्याल. पण काळजी बाळगा. व्यसनांपासून दूर राहा. यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.
69
अंक ६: बुद्धिमत्तेने कामे करा. यश निश्चितच मिळेल. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे. नवीन निर्णय घ्याल. सुखी नातेसंबंध राहतील. कौटुंबीक सुख लाभेल. त्याचा परिणाम तुमच्या कामावर दिसून येईल. दिवसभर उत्साह राहिल.
79
अंक ७: सर्व कामांमध्ये शुभ योग आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. कौटुंबिक जीवन सामान्य राहिल. वाईट गोष्टींपासून दूर राहा. अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात नकारात्मकता भरतील. चांगली गोष्टींचा विचार करा.
89
अंक ८: कठोर परिश्रम करावे लागतील. त्यानंतर शुभ बातमी मिळू शकते. प्रयत्नांती परमेश्वर हे विसरु नका. कोणावरही विश्वास ठेवू नका. विश्वासघात होण्याची दाट शक्यता. त्यामुळे सावध पावले उचला. राजकारणात सावध राहा.
99
अंक ९: ध्येयावर लक्ष केंद्रित करा. सर्व कामांमध्ये यश मिळेल. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. आरोग्यावर खर्च करावा लागू शकतो. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस.