
Nita Ambani 12 Crore Rolls Royce Phantom Car : जगातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक असलेल्या नीता अंबानी त्यांच्या लक्झरी जीवनशैलीसाठी ओळखल्या जातात. त्यांची प्रत्येक निवड चर्चेचा विषय बनते. त्यांचे दागिने आणि साडी लूक तर नेहमीच चर्चेत असतात. मौल्यवान आणि दुर्मिळ रत्ने परिधान करणाऱ्या नीता यांना गाड्यांचीही खूप आवड आहे. त्यांच्या कार कलेक्शनमध्ये अनेक महागड्या आणि लक्झरी गाड्यांचा समावेश आहे. त्यापैकी एक म्हणजे रोल्स रॉयस फँटम VIII एक्सटेंडेड व्हीलबेस (EWB). चला, या कारची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घेऊया.
साल 2024 मध्ये नीता अंबानींच्या कार कलेक्शनमध्ये गुलाबी रंगाच्या रोल्स रॉयस फँटम VIII एक्सटेंडेड व्हीलबेस (Rolls-Royce Phantom VIII Extended Wheelbase) चा समावेश झाला. जिची किंमत 12 कोटी रुपये आहे. वाचून आश्चर्य वाटलं ना? पण ही त्यांची दुसरी इतकी महागडी कार आहे. याआधी 2023 मध्ये मुकेश अंबानींनी त्यांना Rolls-Royce Cullinan भेट दिली होती, ज्याची किंमत 10 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
नीता अंबानींची नवीन Rolls-Royce तिच्या कलर कॉम्बिनेशनमुळे चर्चेत आहे. कारचा वरचा भाग Velvet Orchid, म्हणजेच गडद गुलाबी रंगाचा आहे. तर, खालच्या भागाला Rose Quartz रंगात फिनिशिंग दिले आहे. हे कॉम्बिनेशन कारला एक अत्यंत युनिक आणि रॉयल लूक देते. कारवरील गोल्ड-प्लेटेड Spirit of Ecstasy तिचे सौंदर्य आणि शान अनेक पटींनी वाढवते. याशिवाय, कस्टम डिनर प्लेट व्हील्स आणि सीटवर भरतकामाने बनवलेला NMA (Nita Mukesh Ambani) मोनोग्राम तिला अधिक पर्सनल टच देतो. नीता अंबानी जेव्हा या कारमधून प्रवास करतात, तेव्हा त्या एखाद्या देशाच्या महाराणीपेक्षा कमी दिसत नाहीत.
ही भारतातील मोजक्या Rolls-Royce गाड्यांपैकी एक आहे, जिला अशा रिच कलरमध्ये कस्टमाइझ केले आहे, कारण बहुतेक Rolls-Royce गाड्या काळ्या आणि पांढऱ्या रंगातच दिसतात.
इतके शक्तिशाली इंजिन असूनही, ही कार तिच्या अल्ट्रा-स्मूद राइड क्वालिटीसाठी ओळखली जाते, जी रोल्स रॉयसची ओळख आहे.
नीता अंबानींची Rolls-Royce Phantom VIII EWB त्यांची क्लास, रॉयल आवड आणि लक्झरी जीवनशैलीला अधिक उंचीवर नेते. सोशल मीडियावर आजही या कारचे फोटो व्हायरल होत असतात. मुकेश अंबानींच्या सुंदर पत्नी अनेकदा या कारमधून प्रवास करताना दिसल्या आहेत.