New Year 2025 : नवं वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी बेस्ट आहेत भारतातील ही 5 ठिकाणे

नवे वर्ष लवकरच सुरू होणार आहे. अशातच नवं वर्षाच्या स्वागतासाठी वेगवेगळे प्लॅन केले जातात. यंदा नवं वर्षाच्या स्वागतासाठी एखाद्या ठिकाणी जाण्याचा प्लॅन करत असाल तर भारतातील काही बेस्ट हिल्स स्टेशन आहेत.

5 top places to celebration new year 2025 : वर्ष 2024 चे वर्ष लवकरच संपणार आहे. यानंतर नवं वर्षाचे स्वागत केले जाणार आहे. यासाठी वेगवेगळे प्लॅन तयार केले जातात. नवं वर्षाचे स्वागतासाठी काहीजण मोठे सेलिब्रेशन तर काहीजण घरच्याघरी मित्रपरिवारासोबत आपला वेळ घालवतात. अशातच तुम्ही देखील यंदाच्या नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी एखाद्या ठिकाणी जाण्याचा प्लॅन करत असाल तर पुढील पर्याय बेस्ट आहेत.

मनाली, हिमाचल प्रदेश

मनालीमध्ये नवं वर्षाचे सेलिब्रेशन करणे नेहमीच लक्षात राहण्यासारखे ठरणारे असेल. येथे अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्स जसे की, स्कीइंग, पॅराग्लाइडिंग अथवा ट्रेकिंग करू शकता. याशिवाय बर्फाच्छादित वातावरणात सेलिब्रेन करण्याची मजा दुप्पट वाढली जाईल. मनाली येथे गेल्यानंतर सोलंग व्हॅली, रोहतांग पास, हिडिंम्बा देवी मंदिर आणि ब्यास नदी येथेही भेट देऊ शकता. मनालीमध्ये काही हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स नवं वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी खास आयोजन करतात.

दार्जिलिंग, पश्चिम बंगाल

शांत वातावरणात नवं वर्षाचे स्वागत करायचे असल्यास दार्जिलिंग ठिकाण बेस्ट आहे. दार्जिलिंगमधील टॉय ट्रेन, बत्तलमाता, टायगर हिल्स आणि चहाचे मळे पाहू शकता. याशिवाय दार्जिलिंगमध्ये काही रिसॉर्ट्स आणि कॅफे नवं वर्षाच्या स्वागतासाठी खास पार्टीचे आयोजन करतात. येथे लाइव्ह संगीत, डान्स आणि शानदार डिनरची मजा घेऊ शकता.

शिमला, हिमाचल प्रदेश

शिमलामधील थंड हवा, सुंदर पर्वतरांगा आणि ऐतिहासिक महत्व तुमच्या नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनचा उत्साह दुप्पट वाढवू शकते. शिमला येथे रिज मैदान, मॉल रोड, कुफरी आणि समर हिल्स येथे भेट देऊ शकता.

औली, उत्तराखंड

औली उत्तराखंडमधील एक अद्भूत हिल्स स्टेशन आहे. येथे स्किइंग आणि बर्फाच्छादित पर्वत रांगा पाहू शकता. औलीमधील शांत आणि रोमँटिक वातावरणात मित्रपरिवार किंवा पार्टनरसोबत नवं वर्षाचे सेलिब्रेशन करू शकता.

नैनीताल, उत्तराखंड

नैनीताल येथे सुंदर झरे, हिल स्टेशन आकर्षण बिंदू आहेत. झऱ्यांच्या बाजूला असणाऱ्या शांत वातावरणात तुम्ही नवं वर्षाचे सेलिब्रेशन करू शकता. नैनीताल येथे काही रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स असून नव्या वर्षासाठी खास आयोजन करतात. नैनीताल येथे झरे, नैना देवी मंदिर आणि स्नो व्हू पॉइंट येथे भेट देऊ शकता.

आणखी वाचा : 

रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे ते झोपेसाठी सोपा उपाय, खा अश्वगंधा आणि मध

हिवाळ्यात बोरं खाण्याचे 5 फायदे, C व्हिटॅमिनसह वजन कमी करा!

Read more Articles on
Share this article