
Bike Riding Tips in Rainy Season: पावसाळ्यात बाइक चालवणं खूपच त्रासदायक असतं. रस्त्यावरून बाइक चालवणं हे एक आव्हानच असतं. यावेळी राइडिंग करताना विशेष काळजी घ्यायला हवी, कारण ओल्या रस्त्यांवर स्किड होण्याची शक्यता वाढते. यामुळे बाइकवरील नियंत्रण सुटतं आणि अपघात होण्याची शक्यता असते. म्हणून पावसाळ्यात गाडी चालवताना नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.
जेव्हा तुम्ही तुमची बाइक ओल्या रस्त्यांवरून चालवता तेव्हा स्पीड नियंत्रणाचा विचार करा. पावसाळ्यात बाइकची स्पीड जास्तीत जास्त ३० ते ४० किमी प्रतितास असावी. एवढ्या स्पीडने जर गाडीचं नियंत्रण सुटलं तरीही स्किड होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे तुम्ही पडणार नाही. हा स्पीड तुम्हाला सुरक्षित प्रवास करण्यास मदत करेल.
ओल्या रस्त्यांवर ब्रेक लावल्याने बाइक स्किड होण्याची शक्यता जास्त असते. या परिस्थितीत तुम्ही ब्रेकवर योग्य नियंत्रण ठेवायला हवं. तुम्हाला हळूहळू ब्रेक लावायचे आहेत आणि कमी स्पीडने नियंत्रण ठेवायचं आहे. कधीही अचानक ब्रेक लावू नका. असे केल्याने तुमचं नियंत्रण बिघडू शकतं आणि गाडी स्किड होण्याची शक्यता वाढते.
पावसाळ्यात गाडी चालवताना समोरच्या गाड्यांचाही विचार करा. इतर गाड्यांपासून योग्य अंतर राखा आणि हळूहळू चालवण्याचा प्रयत्न करा. असे केल्याने तुम्ही सहज ब्रेक लावू शकता. समोरच्या गाड्यांपासून अंतर राखल्याने तुम्हाला अचानक ब्रेक लावावे लागणार नाहीत आणि सुरक्षित प्रवास करता येईल.
कधीकधी पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचतं आणि खोलीचा अंदाज येत नाही. अशा वेळी तुम्ही नेहमी खड्ड्यांपासून वाचण्याचा प्रयत्न करायला हवा. जर खड्ड्यातून जाणं भाग असेल तर हळूहळू निघा. जर खड्डा खूप मोठा असेल तर रिस्क घेण्यापेक्षा दुसरा मार्ग वापरा.
(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.