Ganesh Chaturthi 2024 : बाप्पाच्या नैवेद्यासाठी 5 मोदकाचे प्रकार, पाहा रेसिपी

Ganesh Chaturthi 2024 : गणेशोत्सवाचा सण येत्या 7 सप्टेंबरपासून साजरा केला जाणार आहे. यावेळी गणपतीची मनोभावे पूजा-प्रार्थना केली जाते आणि मोदकाचा नैवेद्य खासकरुन दाखवला जातो. अशातच यंदाच्या गणपतीसाठी बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदकाचे काही प्रकार पाहूया…

5 Types of Modak Recipes : गणेशोत्सवाचा सण प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला साजरा केला जातो. यंदा गणेशोत्सवाला 7 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. गणरायाच्या आगमनाची प्रत्येकाला उत्सुकता लागलेली असते. यावेळी घराला सजावट करण्यासह वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. खासकरुन गणपतीला आवडणाऱ्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. यंदाच्या गणेशोत्सवावेळी बाप्पासाठी पुढील काही मोदकाचे काही प्रकार तयार करु शकता.

उकडीचे मोदक
बाप्पासाठी पारंपारिक पद्धतीचे उकडीचे मोदक तयार करु शकता. यासाठी तांदळाचे पीठ, गुळ, खोबऱ्याचा वापर केला जातो. मोदक व्यवस्थितीत वाफवून घेतल्यानंतर त्यावर तुळशीचे पान ठेवून बाप्पाला त्याचा नैवेद्य दाखवू शकता.

 

तळणीचे मोदक
गणशोत्सवावेळी बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी तळणीचे मोदक देखील केले जातात. अगदी 10 मिनिटात तळणीचे मोदक कसे तयार करु शकता याची खाली पाहा रेसिपी.

गव्हाच्या पीठाचे मोदक
गणेशोत्सावेळी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तयार केले जातात. मार्केटमध्येही मोदकांचे वेगवेगळे प्रकार पहायला मिळतात. पण घरच्याघरीच माव्याएवजी यंदा गव्हाच्या पीठाचे मोदक नक्की तयार करुन पाहा.

रसमलाई मोदक
यंदाच्या गणेशोत्सावेळी रसमलाईचे मोदक तयार करू शकता. बाप्पाला नैवेद्य दाखवल्यानंतर आरतीवेळी घरीच तयार केलेले रसमलाई मोदक प्रसाद म्हणून देऊ शकता.

रवा-नारळ मोदक 
रवा आणि नारळाचा वापर करुन बाप्पासाठी मोदक तयार करू शकता. अगदी कमी वेळात होणाऱ्या या रेसिपीसाठी ड्राय फ्रुट्सचाही वापर करू शकता. 

गणेश चतुर्थी आणि शुभ मुहूर्त
यंदा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथीची सुरुवात 6 सप्टेंबर 2024 पासून दुपारी 3 वाजून 01 मिनिटांनी सुरु होणार आहे. ही तिथी 7 सप्टेंबर संध्याकाळी 05 वाजून 37 मिनिटांनी संपणार आहे. यामुळे गणेश चतुर्थी 7 सप्टेंबरला साजरी केला जाणार आहे. या दिवशी बाप्पाची स्थापना करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 11 वाजून 03 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 34 मिनिटांपर्यंत असणार आहे. दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवाची सांगता 17 सप्टेंबरला होणार आहे. या दिवशी अनंत चतुर्थी असून बाप्पाला निरोप दिला जातो.

आणखी वाचा : 

Ganesh Chaturthi 2024 : मुंबईतील 8 प्रसिद्ध गणपती मंडळ, वाचा कुठे व कसे पोहोचाल

Ganesh Chaturthi 2024 : भारतातील 5 प्रसिद्ध गणेशकुंडांबद्दल घ्या जाणून

Read more Articles on
Share this article