येत्या 9 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्त भावासाठी आणि घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास माव्याचे लाडू तयार करू शकता. याची रेसिपी स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.
रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे पवित्र नाते. या खास दिवशी गोडधोड नसेल तर मजा येत नाही. येत्या 9 ऑगस्टला असणाऱ्या रक्षाबंधनाच्या सणानिमित्त खास माव्याचे लाडू तयार करू शकता. याचीच रेसिपी खाली स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया.
साहित्य :
मावा (खवा) – २५० ग्रॅम
साखर – १ कप (पिठीसाखर किंवा थोडी जाडसर)
वेलची पूड – ½ टीस्पून
बदाम – १०-१२ (कापून)
काजू – १०-१२ (कापून)
सुकं खोबरं – २ टेबलस्पून (ऐच्छिक)
तूप – १ टेबलस्पून
केशर – ३-४ काड्या
दूध – २ टेबलस्पून (जरासं मावा कोरडा वाटला तर)
स्टेप 1: माव्याची तयारी
प्रथम माव्याला व्यवस्थितीत मळून घ्या.
नॉनस्टिक किंवा जाड तळाच्या कढईत एक चमचा तूप गरम करा.
त्यात किसलेला मावा घाला. मध्यम आचेवर हलवत-हलवत ७-८ मिनिटं परतून घ्या, जोपर्यंत मावा थोडासा सोनेरी रंगाचा होईल आणि त्याचा सुगंध येईल.
स्टेप 2: साखर मिक्स करा
गॅस बंद करून मावा थोडासा गार होऊ द्या.
मग त्यात पिठीसाखर घाला आणि नीट एकत्र करा.
मिश्रण साखर माव्यात मुरेपर्यंत थोडा वेळ ठेवा. गरज असल्यास १-२ चमचे दूध घालून मळून घ्या.
स्टेप 3: स्वाद आणि सजावट
आता त्यात वेलची पूड, बदाम, काजू, खोबरं आणि हवे असल्यास केशर मिसळा.
सगळं मिश्रण नीट एकत्र करा. थोडं थंड झाल्यावर लाडू वळण्यासाठी सुलभ होईल.
स्टेप 4: लाडू वळा
हाताला थोडं तूप लावून साधारण मध्यम आकाराचे लाडू वळा.
वरून बदाम-काजूच्या कापांनी सजवा.
लाडू १-२ तास मुरू द्या, मग ते अधिक चविष्ट लागतात.
टीप:
हे लाडू ४-५ दिवस फ्रिजमध्ये चांगले टिकतात.
साखर थोडी कमी-जास्त करून आपल्या चवीनुसार प्रमाण बदलू शकता.