ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रह हा धैर्य, शक्ती, जमीन, मालमत्ता आणि करिअरचा कारक मानला जातो. आता मंगळाच्या नक्षत्र बदलामुळे काही राशींना मोठा फायदा होणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी.
वैदिक ज्योतिषानुसार, मंगळ ग्रह २४ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी पुष्य नक्षत्रात प्रवेश करेल. त्यानंतर तो १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत याच नक्षत्रात राहील. या संपूर्ण काळात मंगळ कर्क राशीत असेल. पुष्य नक्षत्राचा स्वामी शनी आणि देवता गुरु आहे. कर्क राशीत मंगळ कमजोर असला तरी, गुरुच्या प्रभावामुळे त्याचे नकारात्मक परिणाम कमी होतील. यामुळे काही राशींच्या लोकांना पैसा, करिअर आणि व्यवसायात चांगले बदल दिसतील.
26
मेष रास
मेष राशीच्या लोकांसाठी मंगळाचं हे नक्षत्र परिवर्तन प्रगतीच्या अनेक संधी घेऊन येईल. खूप दिवसांपासून रखडलेली कामं पुन्हा वेगाने पूर्ण होतील. मालमत्तेशी संबंधित प्रयत्नांमध्येही यश मिळेल. व्यापाऱ्यांना नफा वाढवण्याच्या संधी मिळतील. कुटुंबाचं सहकार्य मिळेल आणि एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील.
36
मकर रास
मकर राशीच्या लोकांच्या कामात आणि पैशांच्या बाबतीत हा काळ बदल घडवणारा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदारी मिळण्यासोबतच तुमच्या मेहनतीला योग्य ओळख मिळेल. खूप दिवसांपासून वाट पाहत असलेल्या नोकरीच्या संधी चालून येतील. व्यवसायात नवीन ओळखींमुळे फायदेशीर संधी निर्माण होतील. उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्ग सापडतील.
सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळाचं हे संक्रमण नव्या संधींची दारं उघडणारं ठरू शकतं. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांना चांगली संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळाल्याने तुमची क्षमता दाखवण्याची संधी मिळेल. यामुळे तुमचा आत्मविश्वासही वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती दिसेल. कुटुंबात एकोपा वाढेल.
56
धनु रास
धनु राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण विशेषतः आर्थिक बाबतीत खूप फायदेशीर ठरू शकतं. उत्पन्न वाढण्याच्या संधींसोबतच व्यवसायात अपेक्षित नफाही मिळू शकतो. खूप दिवसांपासून रखडलेली कामं हळूहळू पूर्ण होतील. कामातील अडथळे कमी होऊन प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांना ओळख मिळेल.
66
कन्या रास
कन्या राशीच्या लोकांसाठी मंगळाचा पुष्य नक्षत्रातील काळ करिअरमध्ये प्रगती, पदोन्नती आणि ओळख मिळवण्यासाठी अनुकूल असेल. नोकरी किंवा व्यवसायात नवीन जबाबदारी मिळाल्याने तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. थांबलेली कामं पुन्हा वेगाने सुरू होतील. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. व्यापाऱ्यांनाही नवीन संधी मिळतील. कुटुंबात शांततेचं वातावरण राहील.