Blanket Cleaning : पाणी आणि साबणाशिवाय जड ब्लँकेट 10 मिनिटांत करा चकचकीत, पाहा सोपी ट्रिक

Published : Sep 15, 2026, 11:58 AM IST

जाडजूड ब्लँकेट पाण्यात भिजवून, धुवून वाळवणं म्हणजे डोक्याला ताप वाटतो का? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. पाणी आणि साबण न वापरता फक्त १० मिनिटांत ब्लँकेट स्वच्छ करण्याची एक जबरदस्त ट्रिक आम्ही सांगणार आहोत.

PREV
16
त्वचेला संसर्ग किंवा ऍलर्जीचा धोका

मुंबई : थंडीच्या किंवा पावसाळ्याच्या दिवसात प्रत्येकाला ब्लँकेट लागतंच. आपण फक्त झोपतानाच नाही, तर टीव्ही पाहताना, लॅपटॉपवर काम करतानाही ब्लँकेट वापरतो. या सततच्या वापरामुळे ब्लँकेटमध्ये धूळ, घाम, तेलकटपणा, अन्नाचे कण आणि धोकादायक बॅक्टेरिया जमा होतात. यामुळे त्वचेला संसर्ग (Infection) किंवा ऍलर्जी होण्याची शक्यता वाढते.

26
साबण पावडरशिवाय स्वच्छ करण्याची पद्धत
जाड ब्लँकेट पाण्यात भिजवून धुणे हे खूप अवघड काम आहे. ओले झाल्यावर ते खूप जड होते आणि थंडीत ते वाळवणे हे एक मोठे आव्हान असते. ड्राय क्लीनिंगला दिल्यास शेकडो रुपये खर्च होतात. पण काळजी करू नका, पाणी आणि साबण न वापरता ब्लँकेट बॅक्टेरियामुक्त आणि स्वच्छ करण्याची सोपी पद्धत आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
36
घरीच ड्राय क्लीन कसे करावे?
सर्वात आधी, ब्लँकेट जमिनीवर किंवा पलंगावर पूर्णपणे पसरा. त्यानंतर, चहाच्या गाळणीत (Strainer) खाण्याचा सोडा (Baking Soda) घ्या आणि तो संपूर्ण ब्लँकेटवर सारखा पसरा. बेकिंग सोड्यामध्ये बॅक्टेरिया मारण्याचे आणि तेलकटपणा शोषून घेण्याचे नैसर्गिक गुणधर्म असतात.
46
ब्रशने घासा
थोड्या वेळाने, कपडे धुण्याचा एक स्वच्छ आणि कोरडा ब्रश घ्या आणि ब्लँकेटवर हलक्या हाताने घासा (स्क्रब करा). यामुळे ब्लँकेटच्या धाग्यांमध्ये अडकलेली धूळ, घाण आणि मृत बॅक्टेरिया पूर्णपणे बाहेर येतील. याचप्रकारे ब्लँकेट उलट करून दुसऱ्या बाजूनेही ही प्रक्रिया करा.
56
दुर्गंधी घालवण्यासाठी
ब्लँकेटमधून येणारा घामाचा किंवा कुबट वास घालवण्यासाठी, एका स्प्रे बाटलीत थोडे गुलाब जल (Rose Water) आणि काही थेंब व्हिनेगर (Vinegar) मिसळा. हे मिश्रण ब्लँकेटवर हलकेच स्प्रे करा. यामुळे ब्लँकेटमधील जंतू नष्ट होतील आणि त्याला एक छान सुगंध येईल.
66
उन्हात वाळवा
शेवटी, हे ब्लँकेट दुपारी फक्त १ ते २ तास कडक उन्हात ठेवा (ऊन नसेल तर फॅनच्या हवेत पसरून ठेवा). आता तुमचे ब्लँकेट कोणत्याही त्रासाशिवाय, पाण्याचा एक थेंबही न वापरता अगदी नवीन, सुगंधी आणि बॅक्टेरियामुक्त होईल! हॉस्टेलमधील विद्यार्थी, बॅचलर्स आणि एकटे राहणाऱ्यांसाठी ही पद्धत एक वरदानच आहे.
Read more Photos on

Recommended Stories