मूग डाळीचा हलवा १० मिनिटांत बनवा; जाणुन घ्या रेसिपी
मूग डाळीचा हलवा बनवण्यासाठी वेळ कमी आहे? काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही १० मिनिटांत स्वादिष्ट मूग डाळीचा हलवा बनवू शकता. डाळ भाजून, वाटून, दुधात शिजवून, साखर आणि ड्रायफ्रूट्स मिसळून लज्जतदार हलवा तयार करा.
हिवाळ्यात गरमागरम भजी असो किंवा गरमागरम हलवा, दोन्ही खाण्यात अप्रतिम चविष्ट लागतात. मूग डाळीचा हलवा बनवायची गोष्ट आली की लोकांना अनेकदा कंटाळा येतो. कारण हलवा बनवायला खूप वेळ लागतो. आज आम्ही तुम्हाला काही अशा टिप्स सांगतोय ज्यांच्या मदतीने काही मिनिटांत मूग डाळीचा हलवा तयार होईल. जाणून घ्या स्वादिष्ट मूग डाळ हलवा कसा बनवता येईल.
मूग डाळ हलवा बनवण्याची पद्धत
मूग डाळ हलवा लवकर आणि चविष्ट बनवायचा असेल तर तुम्ही नवीन ट्रिकचा वापर करू शकता. यामुळे केवळ हलवा लवकर तयार होईलच, शिवाय चवही अप्रतिम लागेल.
मूग डाळ हलवा बनवण्यासाठी सर्वात आधी डाळ स्वच्छ पाण्यात टाकून धुवून घ्या किंवा ओल्या कपड्याने पुसून घ्या. तुम्ही डाळ थोडीशी सुकवूनही घेऊ शकता.
यानंतर एका कडईत तूप गरम करा आणि डाळ हलकी सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. भाजलेली डाळ एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्या.
यानंतर डाळ मिक्सर ग्राइंडरमध्ये भरडसर वाटून घ्या. वाटलेली डाळ पुन्हा कढईत काढा आणि हळूहळू ढवळत राहा. जेव्हा डाळ तेल सोडायला लागेल, तेव्हा त्यात दूध घालून चांगले मिसळा. मंद आचेवर डाळ हलवत राहा. थोड्या वेळाने तुम्हाला दिसेल की दूध पूर्णपणे आटले आहे.
दूध पूर्ण आटल्यावर त्यात साखर घाला. साखर घातल्याने डाळ पुन्हा थोडी ओली होईल. यानंतर डाळ सतत ढवळत राहा.
हलव्यात वेलची पूड आणि आवडते ड्राय फ्रूट्स घालून मिसळा. १० मिनिटांत मूग डाळ हलवा तयार होईल. हा खाण्यास अत्यंत चविष्ट लागेल. यासाठी तुम्हाला पिठाची डाळ तासभर उभे राहून भाजण्याची गरज भासणार नाही. एकदा ही रेसिपी नक्की करून पाहा.