उन्हाळ्यात केसांसाठी दही लावण्याचे फायदे जाणून घ्या

Published : Apr 30, 2025, 03:14 PM IST
Best-hair-colors-for-Indian-skin-tone

सार

उन्हाळ्यातील उष्णतेमुळे होणाऱ्या डोकेदुखी, कोंडा आणि केसगळतीवर दही एक सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे. दहीतील थंडावा आणि प्रोबायोटिक गुणधर्म टाळू शांत ठेवतात आणि कोंडा कमी करतात.

उन्हाळ्यातील उष्णतेमुळे अनेकजण डोकेदुखी, कोंडा, आणि केसगळतीसारख्या समस्यांना सामोरे जात असतात. मात्र, या समस्यांवर एक सोपा आणि नैसर्गिक उपाय म्हणजे डोक्याला दही लावणे. घरच्या घरी सहज उपलब्ध होणाऱ्या दहीचा उपयोग आता फक्त जेवणापुरता न राहता सौंदर्यसुद्धा वृद्धिंगत करण्यासाठी होताना दिसत आहे.

दहीमध्ये नैसर्गिक थंडावा देणारे घटक असतात. त्यामुळे उन्हाळ्यात डोक्याला दही लावल्याने टाळू शांत राहतं आणि डोकेदुखीपासून दिलासा मिळतो. याशिवाय दहीत असलेल्या प्रोबायोटिक गुणधर्मांमुळे टाळूवरील मृत त्वचा आणि फंगल इन्फेक्शन कमी होऊन डेंड्रफपासून सुटका मिळते.

दही हे नैसर्गिक कंडिशनरप्रमाणे काम करतं. यामुळे उन्हामुळे रास आणि कोरडे झालेले केस पुन्हा मऊ, गुळगुळीत आणि चमकदार होतात. केसांची मुळे मजबूत होऊन केसगळती कमी होते. याशिवाय, दहीत असलेले प्रथिने आणि जीवनसत्त्वं केसांच्या वाढीस चालना देतात.

तज्ज्ञांच्या मते, फेटलेलं दही थोडा वेळ केसांवर लावून २० ते ३० मिनिटांनी सौम्य शॅम्पूने धुणं योग्य ठरतं. हप्त्यातून एकदा हा उपाय केल्यास उन्हाळ्याच्या तक्रारी कमी होतात.

सध्या अनेक घरांमध्ये पारंपरिक उपायांमध्ये पुन्हा एकदा रस निर्माण होत असून, दहीसारख्या नैसर्गिक घटकांना सौंदर्यसाधन म्हणूनही महत्त्व दिलं जात आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात केसांचं आरोग्य राखण्यासाठी डोक्याला दही लावणं हा एक चांगला आणि परिणामकारक पर्याय ठरत आहे.

PREV

Recommended Stories

50MP AI कॅमेरा, 33W चार्जिंग, रिव्हर्स चार्जिंगसह 5G मोबाईल, तोही केवळ 12 हजार रुपयांमध्ये!
Join Pain in Winter : थंडीत सांधेदुखीचा त्रास अधिक होत असल्यास करा हे सोपे उपाय, मिळेल आराम