Women Body Facts : महिलांच्या शरीराबद्दल अनोख्या गोष्टी, वाचून डोक्याला येतील मुंग्या

Published : Jul 02, 2025, 12:12 AM ISTUpdated : Jul 02, 2025, 12:13 AM IST

मुंबई - नवीन जीवाला जन्म देण्यापासून ते इतर अनेक गोष्टींपर्यंत, महिला आणि त्यांचं शरीर हे अनेक आश्चर्यकारक वैशिष्ट्यांनी भरलेलं आहे. महिलांबद्दल तुम्हाला माहित नसलेल्या काही अद्भुत गोष्टींबद्दल जाणून घ्या.

PREV
16

महिलांमध्ये जन्म देण्याची शक्ती असते. मुलांना जन्म देण्यासाठी महिलांची शारीरिक जडणघडण विशिष्ट प्रकारे झालेली असते. एक जीव ९ महिने आपल्या शरीरात ठेवून त्यानंतर बाहेरच्या जगात सोडणे हे दिसते तेवढे सोपे नाही. त्यासाठी प्रचंड मानसिक आणि शारीरिक कठोरता लागते.

26

महिलांची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असते. त्यामुळे त्या फार कमी आजारी पडतात. त्यांना जंतू संसर्ग पुरुषांच्या तुलनेत फार कमी प्रमाणात होतो. परंतु, आता मुली पुरेसे आणि संतुलित अन्न घेत नसल्याने त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याचे दिसून येते.

36

महिलांची स्मरणशक्ती पुरुषांपेक्षा जास्त असते. महिलांना अनेक गोष्टी सहज लक्षात राहतात. हे निसर्गाने महिलांना दिलेले वरदान आहे. स्मरणशक्ती चांगली असल्याने त्यांची बुद्धीही कुशाग्र राहते. याचा फायदा त्यांना निर्णय घेण्यात होतो.

46

महिला गंभीर जखमेपासून पुरुषांपेक्षा लवकर बऱ्या होतात. त्यामुळे एखादी जखम झाली असेल तर ती लगेच बरी होते. हेही एक निसर्गाने दिलेले वरदान आहे. पण तरीही जखम होऊ नये याची काळजी घतलेली बरी. 

56

गर्भधारणेदरम्यान गर्भाशय संत्र्याच्या आकारापासून ते कलिंगडाच्या आकारापर्यंत वाढतो. एवढ्या मोठ्या वजनाचे गर्भाशय सांभाळणे म्हणजे तारेवरची कसरतच असते. तरीही त्या कोणतीही कुरकुर न करता गर्भधारणेचा काळ एन्जॉय करतात.

66

पुरुषांपेक्षा महिलांचे स्नायू अधिक लवचिक असतात. पुरुषांचे स्नायू जास्त ताठर असतात. लवचीत स्नायू असल्याने त्यांना त्याचा फायदा होतो. 

Read more Photos on

Recommended Stories