किचनच्या डस्टबिनमधून येणारा घाण वास घालवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स वापरणं गरजेचं आहे. तुमच्याही घरच्या कचऱ्याच्या डब्यातून दुर्गंधी येत असेल, तर या टिप्स नक्की फॉलो करा.
अनेकदा किचनमधील डस्टबिनचा घाण वास संपूर्ण घरभर पसरतो. घरी पाहुणे आल्यावर या वासामुळे तुम्हाला लाजिरवाणे वाटू शकते. डस्टबिनचा हा वास कसा रोखायचा ते आपण पाहूया.
25
२४ तासांपेक्षा जास्त वेळ कचरा ठेवणे
फळे, भाज्यांची साले आणि उरलेले अन्न यामुळे डस्टबिनमध्ये वास येऊ शकतो. ओला कचरा जास्त वेळ किंवा २४ तासांपेक्षा अधिक काळ साठवून ठेवल्यास दुर्गंधी पसरते. काही सोप्या उपायांनी तुम्ही हा वास सहज घालवू शकता.
35
कचऱ्याची पिशवी आणि वर्गीकरण
डस्टबिनमध्ये कचरा टाकण्यापूर्वी त्यात गार्बेज बॅग नक्की लावा. कचरा भरल्यानंतर ही पिशवी बांधून ठेवा, जेणेकरून वास बाहेर येणार नाही. ओल्या आणि सुक्या कचऱ्यासाठी दोन वेगळे डबे वापरा. ओला कचरा २४ तासांपेक्षा जास्त वेळ घरात ठेवू नका.
डस्टबिनच्या तळाशी थोडा बेकिंग सोडा टाका. त्यानंतर डिटर्जंट मिसळलेल्या पाण्याने डस्टबिन धुवा, यामुळे दुर्गंधी येणार नाही. डस्टबिन रोज स्वच्छ करायला विसरू नका. डबा धुतल्यानंतर तो पूर्णपणे सुकल्यावरच त्यात कचरा टाका.
55
न्यूजपेपरची सोपी ट्रिक
डस्टबिन धुतल्यानंतर तो चांगला सुकवून घ्या. त्यानंतर तळाशी स्वच्छ आणि कोरडा न्यूजपेपर अंथरा. हा न्यूजपेपर ओल्या कचऱ्यातील ओलावा शोषून घेतो. न्यूजपेपर ओला झाल्यास तो लगेच बदला. फळे, भाज्यांची साले आणि अन्न डस्टबिनमध्ये जास्त काळ ठेवू नका.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.