तुम्हाला वजन कमी करायचंय का? मग भात आणि चपातीऐवजी ज्वारीची भाकरी खा, असा सल्ला अनेकजण देतात. पण ज्वारीची भाकरी खाल्ल्याने खरंच वजन कमी होतं का? ती किती प्रमाणात खावी? कोणी खावी आणि कोणी खाऊ नये?
सध्या वजन कमी करू इच्छिणारे अनेक लोक भात आणि चपातीऐवजी ज्वारीच्या भाकरीला पसंती देतात. ज्वारीमध्ये फायबर, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारखे पोषक घटक असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात याचा समावेश करू शकता. पण ज्वारीची भाकरी खाल्ल्याने खरंच वजन कमी होतं का? ती किती खावी आणि कोणी खाऊ नये? यावर तज्ज्ञ काय सांगतात?
25
भरपूर फायबर
ज्वारीच्या भाकरीत फायबरचं प्रमाण जास्त असतं. फायबरयुक्त आहार घेतल्यावर पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. यामुळे सतत काहीतरी खाण्याची इच्छा कमी होते. ज्वारीच्या भाकरीसोबत भाज्या आणि डाळी खाल्ल्यास तुमचा आहार संतुलित राहतो. पण तुम्ही मोठ्या आकाराची भाकरी खात असाल किंवा त्यासोबत जास्त तेल, तूप आणि हाय-कॅलरी भाज्या खात असाल, तर वजन कमी करणं कठीण होईल.
35
पुरेशी प्रथिने
तुम्ही ज्वारीची भाकरी कशी खाता, हे खूप महत्त्वाचं आहे. एक किंवा दोन भाकरींसोबत भरपूर भाज्या आणि पुरेशी प्रथिने खाणं, ही योग्य पद्धत आहे. पण तुम्ही जास्त भाकरी खात असाल आणि त्यासोबत तळलेले पदार्थ, जास्त तूप किंवा हाय-कॅलरी साईड डिशेस घेत असाल, तर त्याचा फारसा फायदा होणार नाही.
ज्वारीमध्ये फायबरसोबतच काही महत्त्वाचे पोषक घटकही असतात. पण केवळ या पोषक घटकांमुळे वजन कमी होत नाही. तुमच्या रोजच्या आहारात भाज्या, फळे, डाळी, प्रथिनांचे स्रोत आणि निरोगी चरबी (हेल्दी फॅट्स) योग्य प्रमाणात असायला हवी. तरच तुम्ही वजन कमी करण्याचं ध्येय गाठू शकता.
55
ज्वारीची भाकरी कोणी खाऊ नये?
कोणताही पदार्थ खाल्ल्यावर जर तुम्हाला पोट फुगणे, गॅस, पोटदुखी किंवा इतर त्रास होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. असा त्रास होत असल्यास ज्वारीची भाकरी न खाल्लेली बरी. ज्वारीत फायबर जास्त असल्याने, ती एकदम जास्त प्रमाणात खाल्ल्यास पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे बेताने खाणे आणि पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे. तसेच ॲलर्जी, पचनाचे आजार असलेल्यांनी किंवा विशेष डाएट फॉलो करणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मधुमेहाच्या रुग्णांनी ज्वारीच्या भाकरीला औषधांचा पर्याय मानू नये. त्यांनी स्वतःच्या आरोग्याच्या स्थितीनुसारच ज्वारीची भाकरी खावी.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.