तुम्ही शाकाहारी आहात का? शरीराला आवश्यक प्रोटीन मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात या पदार्थांचा समावेश करू शकता.
हिरव्या वाटाण्यांमध्ये कॅलरीज खूप कमी असतात. यात फायबर, व्हिटॅमिन ए, के, सी, थायामिन, फोलेट आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते.
एका कप सोयाबीनमध्ये २९ ग्रॅम प्रोटीन असते. हे १०० ग्रॅम चिकन ब्रेस्टच्या बरोबरीचे आहे. सोयाबीन खाल्ल्याने वजन कमी होण्यासही मदत होते.
सुमारे २० ते २५ बदामांमध्ये ६ ग्रॅम प्रोटीन असते. यात फायबर असते ज्यामुळे भूक कमी लागते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
भोपळ्याच्या बिया प्रोटीन आणि अनसॅच्युरेटेड फॅट्सचा उत्तम स्रोत आहेत. यात ओमेगा-६ फॅटी ॲसिड देखील मुबलक प्रमाणात असते.
कडधान्यांमध्ये फायबर आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणावर असते. इतर प्रोटीनयुक्त पदार्थांच्या तुलनेत कडधान्ये खूप स्वस्त आणि सहज उपलब्ध असतात.
सुकामेवा खाल्ल्याने वारंवार लागणारी भूक कमी होते. शरीराला आवश्यक असणारे अनेक महत्त्वाचे पोषक घटक सुकामेव्यातून सहज मिळतात.
Garlic Under Pillow : उशीखाली लसूण ठेवण्यामागचं रहस्य तुम्हाला माहितीये का?
1K रुपयांच्या आत मिळणारे Diamond Replica Necklaces
Heavy Design Earrings : हेवी डिझाईन इअररिंग्ज.. पाहताच तुम्ही म्हणाल वाव!
Kitchen Cleaning Tips : सावधान! किचनमधील या ३ गोष्टी रोज स्वच्छ करायलाच हव्यात