Janmashtami 2024 : आज देशभरात जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जात आहे. अशातच तुमच्या घरातील बाळगोपाळाला सजवण्यासाठी खास तयारी केली असेलच. पण मुलाला बाळकृष्णाचा मुकुट अगदी 100 रुपयांपेक्षा कमी खर्चात कसा तयार कराल याच्या काही खास आयडियाज पाहूया.
Janmashtami 2024 Special DIY Paper Mukut : प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी बाळकृष्णाची पूजा-प्रार्थना केली जाते. याशिवाय बहुतांशजण उपवास ठेवून श्रीकृष्णाचा खास श्रृंगार करतात. बाळगोपाळाला पाळण्यात बसवतात. जन्माष्टमीच्या उत्सवाची मोठी धूम देशभरात पहायला मिळते. याशिवाय लहान मुलांनाही बाळगोपाळचे रुप देत सजवले जाते. अशातच 100 रुपयांपेक्षा कमी खर्चात बाळकृष्णाचे मुकुट कसे तयार कराल याच्या खास आयडियाज पाहूया..
श्रीकृष्णाचा जन्मोत्सवानिमित्त शुभ योग
ज्योतिष गणनेनुसार, यंदा श्रीकृष्णाचा 5251 वा जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार, जन्माष्टमीनिमित्त द्वापर युगासारखा शुभ योग जुळून आला आहे. यंदा चंद्र वृषभ राशीत विराजमान झाला आहे. असे म्हटले जाते की, जेव्हा भगवान श्रीकृष्णाचा जन्म द्वापर युगात झाला होता तेव्हाही असाच शुभ योग होता. याशिवाय जन्माष्टमीवेळी सर्वार्थ सिद्धि योगासह शश राजयोग आणि गुरु-चंद्रामुळे गजकेसरी योगही जुळून आला आहे.
आणखी वाचा :
Janmashtami 2024 निमित्त खास संदेश पाठवून साजरा करा कृष्ण जन्मोत्सव
Janmashtami 2024 : बाळगोपाळला सजवण्यासाठी वस्रांचे पाहा खास डिझाइन