रात्री दही खाल्ल्याने सर्दी होते आणि पचन बिघडतं, असा एक समज आपल्याकडे खूप काळापासून आहे. पण यात खरंच काही तथ्य आहे का? रात्री दही खाणं आरोग्यासाठी खरंच वाईट आहे का? चला, या गॅलरीमधून जाणून घेऊया.
लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणाऱ्या पदार्थांमध्ये दह्याला महत्त्वाचं स्थान आहे. रोजच्या जेवणापासून ते देवळातल्या प्रसादापर्यंत आणि कौटुंबिक जेवणावळीत दही-भात हमखास असतो. पण, रात्री दही खावं का? त्याने सर्दी-खोकला होतो का? हा प्रश्न अनेकांना पडतो.
24
रात्री दही खावं का?
खरं तर, निरोगी व्यक्तीने रात्री दही खाऊ नये, असा कोणताही सामान्य वैद्यकीय नियम नाही. दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियमसह अनेक पोषक तत्वं भरपूर प्रमाणात असतात. अनेक अभ्यासांनुसार, दही आतड्यांच्या आरोग्यासाठी (gut health) मदत करू शकतं.
34
दही खाल्ल्याने सर्दी होते का?
रात्री दही खाल्ल्याने सर्दी किंवा खोकला होतोच, याला कोणताही ठोस वैद्यकीय पुरावा नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, फक्त दहीच नाही, तर कोणताही पदार्थ झोपण्याच्या २-३ तास आधी खावा, असं डॉक्टर सांगतात. ज्यांना छातीत जळजळ किंवा ॲसिड रिफ्लक्सचा त्रास आहे, त्यांनी हे पथ्य पाळायलाच हवं. जेवल्यानंतर लगेच झोपल्यास अपचन, पोट फुगण्यासारख्या समस्या होऊ शकतात. तसेच, दुग्धजन्य पदार्थांमुळे ज्यांना त्रास होतो, त्यांनी दही खाणं टाळावं, असा सल्ला डॉक्टर देतात.
रात्री दही खाऊच नये, असा कोणताही वैद्यकीय नियम नाही. विशेषतः, झोपण्यापूर्वी पोटभर जेवण टाळावं आणि जेवण व झोपेमध्ये थोडं अंतर ठेवावं, हे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.