International Yoga Day 2025 : बेली फॅट्स कमी करायचे आहेत? तेही काही दिवसांत? ही 7 योगासने करा

Published : Jun 21, 2025, 10:43 AM IST

International Yoga Day 2025 : जर तुम्हीही तुमच्या पोटाच्या चरबीने त्रस्त असाल आणि ती कमी करू इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला ७ योगासने सांगणार आहोत. ही योगासने केल्याने तुमच्या पोटाची चरबी वितळू लागेल. यासोबतच अनेक आरोग्यदायी फायदेही मिळतील. 

PREV
17
नौकासन (Naukasana)

नौकासन केल्याने पोटावर दबाव येतो. त्यामुळे पोट आत जातं.

कसं करायचं: पाठीवर झोपा, दोन्ही हात डोक्याच्या मागे ठेवा.

पाय आणि वरचा भाग एकाच वेळी हळूहळू वर करा, शरीर एका तिरक्या रेषेत यायला हवं.

२०-३० सेकंद तसंच ठेवा, हळूवारपणे खाली आणा.

फायदा: कोर मसल्स मजबूत होतात, पोटाच्या मध्यभागी चरबी कमी होते.

27
भुजंगासन (Bhujangasana)

कसं करायचं: पोटावर झोपा, तळहात खांद्यांखाली ठेवा.

श्वास घेत छाती वर करा, कोपर थोडे वाकवा.

१५-२० सेकंद श्वास रोखून ठेवा, मग सोडा.

फायदा: पोट आणि कमरेच्या स्नायूंना ताण मिळतो, पचन सुधारतं.

37
धनुरासन (Dhanurasana)

कसं करायचं: पोटावर झोपा, गुडघे वाकवून घोटे पकडा.

श्वास घेत वर खेचा, छाती आणि मांड्या जमिनीपासून वर यायला हव्यात.

१५-३० सेकंद तसंच राहा, हळू सोडा.

फायदा: पोटाच्या स्नायूंवर काम करतं, टोनिंग वाढवतं.

47
पवनमुक्तासन (Pavanamuktasana)

कसं करायचं:पाठीवर झोपून दोन्ही गुडघे छातीकडे खेचा.

हातांनी गुडघे पकडून २०-३० सेकंद ठेवा. हळूहळू पाय पसरा.

फायदा: पोटातील गॅस कमी करतो, पचनक्रिया सुधारतो.

57
कटिचक्रासन (Kati Chakrasana)

कसं करायचं:उभे राहून पाय खांद्याच्या रुंदीइतके ठेवा, हात खांद्यांवर ठेवा.

कमरेने उजवीकडे आणि डावीकडे हळूहळू फिरवा—डावीकडून उजवीकडे.

१०-१५ वेळा करा.

फायदा:कंबरेच्या बाजूची चरबी कमी करण्यास मदत करतो.

67
सूचक्रासन (Surya Namaskar)

कसं करायचं: १२ पायऱ्यांचा (आसनांचा) एक प्रवाह असतो: ताडासन, हस्त उत्तानासन, अश्व संचालन, भुजंगासन इ.

प्रत्येक पायरी व्यवस्थित करा, खोल श्वास घ्या-सोडा. ५-१० फेरे रोज करा.

फायदा: संपूर्ण शरीराला व्यायाम मिळतो, मेटाबॉलिझम वाढवून चरबी जाळतो.

77
शवासन

आसनानंतर श्वासन (Shavasana) नक्की करा, ज्यामुळे स्नायूंना आराम मिळेल. तसेच आसन केल्याने शरीरावर आलेला दबाव कमी होईल. तुम्हाला अतिशय हलके झाल्यासारखे वाटेल. शवासन सर्वात शेवटी केले जाते.

Read more Photos on

Recommended Stories