Parenting Tips : मुलांना अशी लावा Sharing is Caring ची सवय, भविष्यात होईल फायदा

वाढत्या वयासह मुलं अधिक हट्टी होतात. त्यांचा मूड, स्वभाव बदलतो. अशातच आपल्याकडील काही वस्तू इतरांसोबत शेअर करण्यासाठी बहुतांश मुलं नकार देतात. अशातच आंतरराष्ट्रीय बाल दिनानिमित्त मुलांमध्ये शेअरिंगची सवय कशी लावायची याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...

International Children's Day 2024 : आजकाल बहुतांश कपल विभक्त कुटुंब (Nuclear Family) पद्धतीत राहण्याचे पसंत करतात. अशातच मुलांमध्ये देखील संयुक्त परिवारापेक्षा विभक्त कुटुंबात राहणे कालांतराने अंगवळणी पडते. याशिवाय विभक्त कुटुंबात मुलं जे म्हणेल त्याची इच्छा पालकांकडून वेळोवेळी पूर्ण केली जाते. अशातच मुलाला काही गोष्टींचे महत्व न समजण्यासह त्याच्यामध्ये शेअरिंगची सवय निर्माण होते. याचा परिणाम असा होतो की, ज्यावेळी दुसऱ्या मुलाने त्याच्याकडून एखादी गोष्ट हिसकावून घेतली किंवा हात लावला तरीही तो रडण्यास सुरुवात करतो. या स्थितीत पालकांनी मुलांना शेअरिंग करण्याची सवय बालपणापासून लावली पाहिजे.

या उलट स्थिती कधीकधी अशी असते की, मुलं आपल्याकडील गोष्टी शेअर करण्यासाठी घाबरतात अथवा कोणाशीही बोलत नाही. एकट्यात राहून खेळतात आणि काही गोष्टी करतात. मुलाचे असे वागणे त्याला भविष्यात धोक्यात घालू शकते. यामुळेच पालकांनी मुलांच्या वागण्या-बोलण्याकडे सातत्याने लक्ष द्यावे. यामुळे मुलामध्ये इतरांच्या प्रति देखील आपलेपणाची भावना निर्माण होईल. अशातच आंतरराष्ट्रीय बाल दिनानिमित्त पालकांनी मुलांबद्दलच्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याबद्दल जाणून घेऊया सविस्तर....

मुलांना सांगा शेअरिंगचे महत्व
मुलांना शेअरिंगचे महत्व माहिती नसते. अशातच पालकांची जबाबदारी असते की, मुलांना शेअरिंग इज केअरिंगबद्दल सांगावे. यासाठी मुलांना पालकांनी शेअरिंग संबंधित काही किस्से अथवा कथा सांगाव्यात. जेणेकरुन मुलांना कळू शकते की, आनंदाने दुसऱ्यांना आपल्याकडील काही गोष्टी शेअर करू शकतो.

खेळता-खेळता शिकवा शेअरिंगची सवय
मुलांना खेळता-खेळता काही गोष्टी शिकवणे फार उत्तम मार्ग आहे. अशातच मुलांना शेअरिंगची सवय लावण्यासाठी खेळताना त्याच्याकडील वस्तू दुसऱ्यांसोबत शेअर करताना कसे वागावे असे देखील सांगावे. याशिवाय पालकांनी कधीच मुलांवर रागवत शेअरिंगबद्दलची सवय लावाली. यामुळे मुलं हट्टी होऊ शकतात.

मुलांचे कौतुक करा
मुलं आपल्याकडील काही गोष्टी इतरांसोबत शेअर केल्यास त्यावेळी त्याचे कौतुक करा. यामुळे मुलांचे मनोबल वाढले जाते. अशातच मुलांमध्ये नेहमीच इतरांसोबत खेळताना  आपल्याकडील काही गोष्टी शेअर करण्याची सवय लागू शकते. हीच सवय मुलांना भविष्यात फायदेशीरही ठरते. 

मुलांसोबत जबरदस्ती करू नका
तुमचे मुलं एखादी गोष्ट दुसऱ्यांसोबत शेअर करत नसल्यास त्यावेळी त्याच्यासोबत जबदरस्ती करू नका. याशिवाय मुलाकडील वस्तू हिसकावून घेऊन समोरच्या मुलालाही देऊ नका. यामुळे मुलं तुमचा राग करू शकते. अशातच मुलांना नेहमी प्रेमाने-मायेने शेअरिंग इज केअरिंगबद्दलच्या काही गोष्टी समाजवून सांगाव्यात.

आंतरराष्ट्रीय बाल दिवसाची सुरुवात
आंतरराष्ट्रीय बाल दिवस प्रत्येक वर्षी 1 जूनला साजरा केला जातो. याची सुरुवात वर्ष 1925 मध्ये जिनेव्हामध्ये जागतिक सम्मेलनावेळी झाली. 4 नोव्हेंबर, 1949 रोजी मॉस्कोमध्ये महिला आंतराष्ट्रीय लोकशाही संघाने 1 जूला मुलांच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय बाल दिवसाची घोषणा केली. वर्ष 1950 नंतर 1 जूनला काही कम्युनिस्ट आणि कम्युनिस्ट-उत्तर देशांमध्ये बाल दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.

आंतरराष्ट्रीय बाल दिवस जगभरातील काही देशांमध्ये साजरा केला जातो. खासकरुन पूर्व सोव्हियत राज्य आणि अन्य देशांमध्ये जेथे मुलांच्या अधिकारांसंदर्भात जनजागृती करणे महत्वाचे आहे. हा दिवस चीन, रशिया, युक्रेन, पोलँड, रोमानिया, हंगरी, मंगोलिया, बेलारूस, जॉर्जिया अशाकाही देशांमध्ये साजरा केला जातो.

आणखी वाचा : 

उन्हाळ्यात Waxing केल्यानंतर त्वचेवर पुरळ आल्यास करा हे 5 घरगुती उपाय

Health Care : महिलांनो वयाच्या तिशीनंतर अशी घ्या आरोग्याची काळजी, रहाल फिट आणि हेल्दी

Share this article