डोसा किंवा इडली खायची असेल तर आधीपासूनच पीठ तयार करावं लागतं. आयत्या वेळी नाश्ता बनवायचा असेल तर उपम्याशिवाय दुसरा पर्याय नसतो, असं अनेकांना वाटतं. पण तुम्ही नेहमीच्या डोशापेक्षाही चविष्ट असा इन्स्टंट डोसा फक्त १० मिनिटांत बनवू शकता.
डोसा हा अनेकांचा आवडता नाश्ता आहे. आपण घरी रोज डोसा बनवतो किंवा बाहेर जाऊनही आवडीने खातो. डोसा खायला सगळ्यांनाच आवडतो, पण तो बनवायला खूप वेळ लागतो. आदल्या दिवशी डाळ आणि तांदूळ भिजत घालावे लागतात. पाच ते सहा तासांनंतर पीठ वाटून घ्यावं लागतं आणि किमान ६ तास ते आंबवण्यासाठी ठेवावं लागतं. तरच डोसा चविष्ट होतो. आदल्या दिवशी तयारी केली नाही तर डोसा खाणं शक्यच नसतं. पण आता डाळ भिजवण्याची झंझट न ठेवता तुम्ही फक्त १५ मिनिटांत टेस्टी डोसा बनवू शकता. हा डोसा नेहमीच्या डोशापेक्षा खूपच चविष्ट लागतो. चला तर मग, हा डोसा कसा बनवायचा ते पाहूया...
23
इन्स्टंट डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य...
तांदळाचं पीठ, बेसन, रवा, दोन बटाटे, एक छोटी वाटी दही आणि पाणी.
डोशाचं पीठ बनवण्याची कृती...
सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी तांदळाचं पीठ, एक वाटी बेसन आणि अर्धी वाटी रवा घ्या. यात दोन बटाट्यांची सालं काढून त्याचे छोटे तुकडे करून टाका. आता यात पाव वाटी दही आणि थोडं पाणी घालून हे मिश्रण बारीक वाटून घ्या. या पिठावर झाकण ठेवून ते थोडा वेळ बाजूला ठेवा. दहा मिनिटांनंतर पीठ चांगलं मिसळून घ्या आणि त्यात मीठ घाला. या मिठावर अर्ध्या लिंबाचा रस पिळा. त्यानंतर पीठ पुन्हा एकदा चांगलं एकजीव करा. गरज वाटल्यास थोडं पाणी घाला. तुमचं इन्स्टंट डोशाचं पीठ तयार आहे.
33
डोसा बनवण्याची कृती...
आता गॅसवर तवा गरम करायला ठेवा. तवा चांगला गरम झाल्यावर गॅस बारीक करा आणि त्यावर पातळ डोसा पसरवून घ्या. बारीक गॅसवरच डोसा हळूहळू भाजू द्या. कडेने तूप किंवा तेल सोडा. याला थोडा वेळ लागेल. पण डोसा लालसर भाजून झाल्यावर तो पलटी करा आणि दुसऱ्या बाजूनेही दोन सेकंद भाजू द्या. तुमचा गरमागरम डोसा तयार आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणीसोबत हा डोसा खाऊ शकता. तुम्ही नेहमी खाणाऱ्या डोशापेक्षा हा डोसा खूपच चविष्ट लागतो आणि तो अगदी कमी वेळात तयार होतो.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.