Hug Day 2024 : व्हॅलेंनटाइन वीकमधील 'हग डे' साजरा करण्यासाठी पार्टनरला खास मेसेज, शुभेच्छा पाठवून व्यक्त करा मनातील भावना
'व्हॅलेंनटाइन वीक' मधील सहावा दिवस म्हणजेच 12 फेब्रुवारील 'हग डे' साजरा केला जाणार आहे. या दिवसानिमित्त तुम्ही पार्टनरला तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी खास मेसेज पाठवू शकता.
Chanda Mandavkar | Published : Feb 11, 2024 5:46 PM / Updated: Feb 12 2024, 02:55 PM IST
Happy Hug Day 2024 Wishes : 'व्हॅलेंनटाइन वीक'ला सुरूवात झाली आहे. या वीकसाठी प्रेमी युगुल अत्यंत उत्साही असतात. 'व्हॅलेंनटाइन वीक मधील प्रत्येक नव्या डे निमित्त आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी केल्या जातात. अशातच 12 फेब्रुवारीला 'हग डे' साजरा केला जाणार आहे. या दिवशी पार्टनरला तुम्ही खास मेसेज, शुभेच्छा पाठवून आपल्या मनातील भावना व्यक्त करू शकता.
आयुष्यभर साथ देण्यासाठी सदैव तु माझ्या सोबत राहा हॅप्पी हग डे!
हग डे निमित्त तुला खूप Miss करतोय येशील का सांग भेटण्यास मला? वाट पाहतोय तुझ्याच ओढीची 'हग डे' निमित्त हार्दिक शुभेच्छा!
एकमेकांची गळाभेट घेत साजरा करूयात आजचा हग डे! हॅप्पी हग डे!
तुझ्याच येण्याची वाट पाहतोय मी हग डे निमित्त तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी आतुर आहे मी 'हग डे' निमित्त हार्दिक शुभेच्छा!
सर्व दु:ख, राग तुझ्या कवेत विसरून जातो मी अशीच आजन्म साथ देशील मला याचीच अपेक्षा करतोय मी हॅप्पी हग डे!
तुझ्यावर असलेले माझे प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्दच अपुरे पडतील तुला मिठी मारताच तुझ्या मनातील भावना आपोआप मला कळतील 'हग डे' निमित्त हार्दिक शुभेच्छा!
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ दे मला काहीही झाले तरीही सोडून जाऊ नको मला माझाच होशील असे वचन दे मला हॅप्पी हग डे!
आयुष्यभर तुझाच सहवास मला मिळो हिच इश्वराचरणी प्रार्थना 'हग डे' निमित्त हार्दिक शुभेच्छा!
तुझा स्पर्श नेहमीच हवाहवासा वाटतो तुझ्या मिठीतला प्रत्येक क्षण मला नेहमीच आठवतो 'हग डे' निमित्त खूप खूप शुभेच्छा!
आयुष्य फार सुंदर आहे केवळ तुझ्याच सहवासामुळे हॅप्पी हग डे!
'व्हॅलेंनटाइन डे' साजरा करण्याची सुरुवात रोमन फेस्टिव्हल पासून झाली. जगभरात पहिल्यांदा 496 मध्ये 'व्हॅलेंनटाइन डे' साजरा करण्यात आला. त्यानंतर पाचव्या शतकात रोमचे पोप गेलासियस (Pope Gelasius) यांनी 14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंनटाइन डे' साजरा करण्याची घोषणा केली होती.