घरच्या घरी कुरकुरीत भजे बनवा, रेसिपी जाणून घ्या

पावसाळ्यात चहासोबत आवडणारे कुरकुरीत भजे बनवण्याची सोपी रेसिपी. बेसन, तांदळाचे पीठ आणि आवडत्या भाज्या वापरून हे चविष्ट भजे बनवा.

भजे हा प्रत्येक घरात आवडीने खाल्ला जाणारा आणि खासकरून पावसाळ्यात व चहा सोबत आवडता नाश्ता आहे. कुरकुरीत आणि चविष्ट भजे तयार करण्यासाठी खालील सोपी रेसिपी वापरा:

साहित्य:

 1 कप बेसन, 1 चमचा तांदळाचे पीठ (भजे कुरकुरीत होण्यासाठी), चिमूटभर हळद , 1 चमचा तिखट, 1/2 चमचा धणे पूड, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ, पाणी (पीठ भिजवण्यासाठी), भज्यांसाठी कांदे, बटाटे, किंवा भेंडी (हवे असल्यास पालक किंवा पनीर वापरू शकता), तळण्यासाठी तेल

कृती: 

  1. एका वाडग्यात बेसन, तांदळाचे पीठ, हळद, तिखट, हिंग, धणे पूड, आणि मीठ एकत्र करा. 
  2. हळूहळू पाणी घालून सरसरीत पण घट्टसर पीठ तयार करा. पीठ फार पातळ होऊ देऊ नका. 
  3. कांदा, बटाटा, किंवा भजीसाठी निवडलेली भाजी कापून त्यात घालून मिक्स करा. 
  4. कढईत तेल गरम करा. तेल पुरेसे तापल्यावर मध्यम आचेवर भजे तळा. 
  5. भजे सोनेरी रंगाची आणि कुरकुरीत झाली की बाहेर काढून टिश्यूवर ठेवा, जेणेकरून अतिरिक्त तेल निघेल.

सर्व्हिंग टिप: 

गरमागरम भजे हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा. चहासोबत याचा आस्वाद घ्या आणि पावसाळ्याचा आनंद लुटा!

टीप: 

तांदळाचे पीठ घातल्याने भजे अधिक कुरकुरीत होतात, त्यामुळे ही युक्ती वापरायला विसरू नका.

Share this article