पनीर हा भारतीय आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. तो प्रथिनांनी समृद्ध असून अनेक पदार्थांमध्ये वापरला जातो. मात्र, नासके किंवा भेसळयुक्त पनीर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे पनीर खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
ताजेपणा तपासा:
ताजे पनीर नेहमी पांढऱ्या रंगाचे आणि मऊसर असते. ते दाबल्यावर लवकर मोडत नाही. जुने किंवा खराब पनीर पिवळसर दिसते आणि त्याला दुर्गंध येतो.
सुगंध व चव:
पनीरचा वास सौम्य आणि ताजा असावा. खराब झालेल्या पनीरला आंबट किंवा विचित्र वास येतो.
पाण्याचा अतिरीक्त साठा नाही ना?
काही वेळा पनीर जास्त पाण्यात बुडवून ठेवले जाते, त्यामुळे ते लवकर खराब होते. त्यामुळे पनीर खरेदी करताना त्यामधील पाण्याचे प्रमाण तपासा.
ब्रँडेड की स्थानिक?
शक्यतो एफएसएसएआय (FSSAI) प्रमाणित ब्रँडचे पनीर घ्या, कारण ते अधिक सुरक्षित असते. स्थानिक दुकानातून घेताना विश्वसनीय ठिकाणावरूनच घ्या.
योग्य तापमानात साठवणूक: पनीर फ्रिजमध्ये १-२°C तापमानात साठवले पाहिजे. बाहेर ठेवल्यास ते पटकन खराब होते.