हिवाळ्यात स्नायूंच्या दुखण्यापासून मिळवा सुटका, स्ट्रेचिंगला करा सुरुवात

Published : Jan 05, 2025, 08:33 PM IST
roshni

सार

हिवाळ्यात थंडीमुळे स्नायूंमध्ये कडकपणा आणि वेदना वाढतात. स्ट्रेचिंग, व्यायाम, उन्हात वेळ घालवणे, योग्य आहार, हायड्रेशन, उबदार कपडे आणि आरामदायी झोप यांसारख्या उपायांमुळे या वेदना कमी करण्यास मदत होते.

हिवाळ्यात थंडीमुळे स्नायूंमध्ये कडकपणा आणि वेदना वाढू शकतात. या समस्येवर उपाय म्हणून खालील गोष्टी उपयुक्त ठरू शकतात. आपल्या स्नायूंना हिवाळ्यामध्ये थंडी लागल्यावर दुखणे वाढू शकते, अशावेळी काय करायचं याबद्दल डॉक्टर मार्गदर्शन करत असतात. अशावेळी आपण डॉक्टरने सांगितलेल्या गोष्टींचं पालन करायला हवं. 

1. स्ट्रेचिंग आणि व्यायाम: 

  • दररोज सकाळी उठल्यानंतर हलके स्ट्रेचिंग आणि व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायूंचा कडकपणा कमी होतो. 
  • सायकलिंग, चालणे आणि योगासारखे व्यायाम उपयुक्त आहेत. अशावेळी आपल्या स्नायूंना आराम मिळत असतो. 

2. उन्हात वेळ घालवा: 

  • सकाळी किंवा दुपारच्या वेळी थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसल्याने जीवनसत्त्व D मिळते, ज्यामुळे हाडे आणि स्नायूंचे आरोग्य सुधारते.
  • उन्हात वेळ घालवल्यास आपल्या शरीराला चांगला आराम मिळत असतो. 

3. योग्य आहार: 

  • कॅल्शियम, जीवनसत्त्व D आणि K समृद्ध अन्नपदार्थांचा समावेश करा. 
  • पालक, कोबी, टोमॅटो आणि संत्री यांसारख्या भाज्या आणि फळे उपयुक्त आहेत. त्या भाज्यांचा नियमितपणे आहारात समावेश करायला हवा. 

4. हायड्रेशन: 

  • हिवाळ्यात पाणी पिणे कमी होते, परंतु शरीर हायड्रेटेड ठेवणे महत्त्वाचे आहे. 
  • यामुळे स्नायूंचे कार्य सुधारते आणि वेदना कमी होतात. त्यामुळे आपण नियमितपणे पाणी प्यायला हवं. 

5. उबदार कपडे घाला: 

  • थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे घालून स्नायूंना संरक्षण द्या.
  • उबदार कपडे ठेवल्यामुळे आपल्या स्नायूंना उबदार राहतो. 

6. आरामदायी झोप: 

  • योग्य झोप आणि विश्रांती घेतल्याने स्नायूंची दुरुस्ती होते आणि वेदना कमी होतात.

वरील उपायांमुळे हिवाळ्यात स्नायूंच्या वेदना कमी करण्यास मदत होऊ शकते. जर समस्या कायम राहिल्यास, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

PREV
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

Recommended Stories

Expiry Date vs Best Before : एक्सपायरी डेट आणि बेस्ट बिफोर एकच आहेत का? सामान घेण्यापूर्वी हे नक्की वाचा
Chanakya Niti : कुटुंबापासूनही लपवून ठेवाव्यात या 5 गोष्टी; चाणक्य नीतीचा महत्त्वाचा धडा