
फोन वापरण्यासाठी Gmail ID असणे आवश्यक आहे. कुठल्याही अॅप किंवा वेबसाइटमध्ये साइन अप-लॉगिन करण्यासाठीही याचा वापर होतो. अशावेळी अनेकदा लोकांचे जीमेल फुल असल्याचे दिसून येते. ज्यामुळे ते येणारे महत्त्वाचे मेल्स वाचू शकत नाहीत. जर तुम्हीही याच समस्येने त्रस्त असाल आणि प्रयत्न करूनही जीमेल स्टोरेज रिकामी करू शकत नसाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला सोप्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने काही मिनिटांत Gmail Storage रिकामी करता येईल. चला तर मग जाणून घेऊया कसे?
जीमेल वापरताना नकळत आपण अनेकदा अशा प्रमोशनल ईमेल्स आणि न्यूजलेटर्सचे सबस्क्रिप्शन घेतो जे दररोज अनेक मेल्स पाठवतात. ज्यामुळे हळूहळू १५ जीबी स्टोरेज फुल होते. आता एकेक करून हजारो मेसेज डिलीट करणे सोपे नाही. ही स्टोरेज Gmail सोबत Google Drive आणि Google Photos ची देखील असते.
एकाच वेळी जीमेल डिलीट करताना महत्त्वाच्या गोष्टीही जाऊ शकतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्यांचा वापर करता येईल.