मुलं उलट उत्तरे देतो? या 4 पद्धतीने करा हँडल

Published : Jan 15, 2025, 01:14 PM IST
arroegent child

सार

बहुतांश आई-वडील आपल्या मुलांना फार लाडवून ठेवतात. यामुळे मुलं कधीकधी इतरांसोबत बेशिस्तपणे वागतो. एवढेच नव्हे वेळ पडल्यास आई-वडिलांनाही उलट उत्तरे देतो. अशातच उलट उत्तरे देणाऱ्या मुलाला कसे हँडल करायचे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Parenting Advice : सध्याच्या मुलांमध्ये आई-वडिलांच्या प्रति सन्मान न करणे किंवा लगेच उलट उत्तरे देणे अशा सवयी फार दिसून येतात. खरंतर, मुलांचे असे वागणे पालकांसाठी एक मोठी समस्या झाली आहे. अशातच मुलाने उलट उत्तरे दिल्यानंतर त्याला शिक्षा देणे किंवा मारणे हा उपाय नव्हे. यासाठी काही ट्रिक वापरुन मुलाला हँडल करू शकता.

सकारात्मक संवाद

मुलं आई-वडिलांसोबत वाईट वागत असेल किंवा सतत उलट उत्तरे देत असल्यास सर्वप्रथम त्याच्या अशा वागण्यामागील कारण काय हे जाणून घ्या. काहीवेळेस मुल एखाद्या मानसिक दबावामुळेही असे वागू शकते. यामुळे पालकांनी त्यासोबत शांतपणे सकारात्मक संवाद साधावा. जेणेकरुन मुलाच्या मनाची स्थिती काय आहे हे कळू शकेल.

नियमांचे पालन

कधीकधी मुलं विनाकारण आई-वडिलांना उलट बोलतात. यामुळे राग येणे सहाजिकच आहे. पण मुलांसाठी जे नियम तयार केले आहेत ते त्याला फॉलो करण्यास सांगावे. एखाद्याशी कसे बोलावे, वागावे याबद्दलची समज पालकांनी मुलाला द्यावी. मुलं एखाद्याची गैरवर्तवणूक करत असेल तर त्याला वेळीच तेथेच पालकांनी रोखावे.

शिक्षा द्या पण समजूतदारपणाही दाखवा

मुलं बेशिस्तपणे वागलं किंवा उलटं बोलल्यानंतर काही पालक संतप्त होत त्यांना मारहाण करतात. अथवा एखादी शिक्षा देतात. असे केल्याने मुलांच्या मनात तुमच्याबद्दल राग निर्माण होऊ शकतो. ही स्थिती उद्भवू नये म्हणून मुलाला अशी शिक्षा द्या की ज्यामधून त्याला काही गोष्टींबद्दलची समज मिळेल.

दुसऱ्या मुलांसोबत तुलना करणे टाळा

बहुतांश आई-वडील मुलाच्या वागण्यामुळे त्याची दुसऱ्या मुलासोबत तुलना करण्यास सुरुवात करतात. असे करण्याएवजी पालकांनी त्याच्या चांगल्या सवयी आणि सकारात्मक बाजू कोणती आहे हे समजून सांगावे. जसे की, संपूर्ण दिवसभरात कोणत्या चांगल्या गोष्टी केल्यात किंवा स्वत: ची कामे किती उत्तमपणे करतो याची आठवण मुलाला करुन द्या.

आणखी वाचा : 

Chanakya Niti: मुलांवर लहानपणी कसे संस्कार करावेत, चाणक्य सांगतात

फिट, मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी करा ही 3 योगासने, वाचा फायदे

PREV

Recommended Stories

अंबानींच्या ज्वेलरी कलेक्शनची चर्चा! २०२५ मध्ये टॉपवर असलेले नीता-ईशाचे १० सर्वाधिक महागडे आणि स्टायलिश दागिने पाहा!
फक्त ₹700 मध्ये! 'या' 1 ग्राम गोल्ड चेन डिझाईन्स पुढे खरं सोनंही फिकं पडेल!