
मेष: एखाद्याला मदत करायला जाल आणि बदल्यात अपमान सहन करावा लागेल. घर बांधण्यासाठी चांगली वेळ येत आहे. वैवाहिक जीवनात सुख-शांती राहील. मुलांच्या नशिबामुळे आज थोडीफार कमाई होऊ शकते. घरातील वृद्ध व्यक्तींच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्या. आज कामात फारसा उत्साह नसेल. विद्यार्थ्यांसाठी मात्र आजचा दिवस चांगला आहे. इतरांना मदत करण्याची संधी मिळेल. यात थोडे पैसे खर्च होऊ शकतात, पण मानसिक समाधान नक्की मिळेल. पत्नीसोबत थोडे मतभेद होऊ शकतात. मनातली बंडखोर वृत्ती बाजूला ठेवा, नाहीतर अडचणीत याल. व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता आहे.
वृषभ: आज इतरांवर टीका करणं टाळा. मित्रांसोबतचे संबंध चांगले राहतील. जुने वाद आज मिटू शकतात. दिवसभर कामात आळस जाणवेल, पण पैशांची बचत चांगली होईल. आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे. पण त्याचवेळी एखाद्या संकटाचीही शक्यता आहे. तुमची प्रलंबित कामं लवकरात लवकर पूर्ण करा. तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात प्रगती होईल. समाजसेवेच्या कामातून मनाला शांती मिळेल. आज तुमच्यावर एखादा खोटा आरोप लागण्याची शक्यता आहे.
मिथुन: मुलांच्या परीक्षेचा निकाल चांगला लागेल. शरीरात थोडा अशक्तपणा जाणवू शकतो. आज एखाद्या सामाजिक कामात तुम्हाला तुमचं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. दूरच्या नातेवाईकाच्या आजारपणाची बातमी येऊ शकते. राजकीय वादात अडकण्याची शक्यता आहे. तीर्थयात्रेचा योग जुळून येत आहे. कामाच्या ठिकाणी तुमचा निष्काळजीपणा तुमचं नुकसान करू शकतो. रस्त्यावरून चालताना काळजी घ्या, अपघाताची शक्यता आहे. अंगदुखीचा त्रास वाढू शकतो. जुन्या आजारांवर त्वरित उपचार घ्या. एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीने कुटुंबाची प्रगती होईल.
कर्क: प्रेमाच्या नात्यातील गुंता सुटेल. आज खर्चावर थोडं नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात. ऑफिसमध्ये प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. नवीन काम करण्यासाठी तुमचा उत्साह वाढेल. पत्नीसोबतचे मतभेद दूर होतील. महिलांबद्दलचं आकर्षण वाढू शकतं. मुलांना चांगली बुद्धी सुचेल. भावंडांसोबत अचानक वाद होऊ शकतात. आजारपणामुळे खूप पैसे खर्च होऊ शकतात. खूप दिवसांपासून ठरलेल्या प्रवासाच्या बेतात अडथळे येऊ शकतात.
सिंह: तुमच्या स्पष्टवक्तेपणामुळे समाजात तुमचा मान वाढेल. मुलांसोबतचे नातेसंबंध चांगले राहतील. जास्त कष्ट केल्यामुळे शारीरिक त्रास वाढू शकतो. आज कामासाठी घराबाहेर राहावं लागल्याने मन उदास होऊ शकतं. पण तुमच्या कष्टाचं फळ चांगलं मिळेल. एखादं चांगलं काम करण्याची संधी मिळेल. आज नशिबाची उत्तम साथ मिळेल. आगीपासून सावध राहा. घरातील मोठ्या व्यक्तींसोबत मतभेद होऊ शकतात. संगीताच्या क्षेत्रात नवीन संधी मिळू शकतात. नवीन कामाची बातमी मिळू शकते. पैशांच्या बचतीवरून पत्नीसोबत वाद होण्याची शक्यता आहे.
कन्या: प्रेमाच्या बाबतीत खूप सावध राहा, फसवणूक होण्याची शक्यता आहे. तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी आज योग्य व्यक्ती भेटेल. कुणाच्याही चिथावणीला बळी पडू नका. आज एखादी वाईट बातमी कानावर येऊ शकते. दुःखाची बातमी मिळाल्यामुळे दिवसभर मन अस्वस्थ राहील. विज्ञानाच्या अभ्यासात प्रगती होण्याची चिन्हे आहेत. कुटुंबातील वाद मिटण्याची शक्यता आहे. जास्त बोलण्यामुळे मात्र नवीन अडचणी निर्माण होऊ शकतात.
तूळ: आज जास्त हाव करणं अंगलट येऊ शकतं. डोकं शांत ठेवूनच महत्त्वाच्या कामाला सुरुवात करा. नोकरदार वर्गाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील. नवीन कामाची संधी मिळेल किंवा जास्तीची कमाई होऊ शकते. खूप मेहनत करूनही तुमच्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत. आज कोणत्यातरी कारणामुळे दिवसभर चिडचिड होईल. तिसऱ्याच व्यक्तीमुळे घरात वाद होऊ शकतात. शिक्षक वर्गासाठी आजचा काळ चांगला आहे. उंचावरून पडून दुखापत होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक: आज दुसऱ्याला आनंदी करण्यासाठी तुम्हाला स्वतःला त्रास सहन करावा लागेल. अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने कायदेशीर मदत मिळू शकते. कोणत्याही स्पर्धेत जिंकण्याची आशा ठेवू शकता. कामाच्या ठिकाणी स्वतःच्या चुका लपवण्यासाठी खोट्याचा आधार घ्यावा लागेल. आज कामात उत्साह वाढेल. यश मिळण्याची दाट शक्यता आहे. कर्ज फेडण्याची संधी मिळेल. नवरा-बायकोचं नातं खूप चांगलं राहील. काही महत्त्वाची चर्चा करायची असेल तर ती आजच उरकून घ्या. शारीरिक अशक्तपणामुळे त्रास होऊ शकतो. विद्यार्थ्यांना काहीतरी चांगलं करून दाखवण्याची संधी मिळेल.
धनु: जवळच्या व्यक्तीसोबत वाद होऊ शकतो. प्रेमाच्या नात्यात नवीन वळण येऊ शकतं. व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. आज चांगल्या गोष्टींचा आनंद घेता येईल. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. आज दिवसभर थोडा थकवा जाणवेल. एखाद्या रचनात्मक कामाचा विचार मनात येऊ शकतो. आज कामाच्या ठिकाणी विरोधाची भूमिका सोडून दिलेलीच बरी. कर्ज फेडण्यामुळे पैशांच्या बचतीत अडथळा येईल. घरात नवीन पाळीव प्राणी आणल्यामुळे आनंद मिळेल. एखाद्या कायदेशीर प्रकरणात अडकण्याची शक्यता आहे.
मकर: मित्रावर जास्त विश्वास ठेवल्यामुळे नुकसान सहन करावं लागू शकतं. छोटासा वाद थेट कोर्टापर्यंत जाऊ शकतो. प्रवासात विशेष काळजी घ्या. सकाळच्या वेळी आर्थिक नुकसानीची बातमी मिळू शकते. आज व्यवसायात उत्पादन वाढेल. तुमच्या मोठ्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये आज तुम्हाला कुणाच्या तरी हाताखाली काम करावं लागू शकतं. एखाद्या नातेवाईकाकडून आज विशेष मदत मिळेल. पैशांची उधळपट्टी केल्यामुळे घरात वाद होऊ शकतात. मुलांसोबत एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. तुमच्यातील एखाद्या कलागुणामुळे आज तुम्हाला प्रसिद्धी मिळेल.
कुंभ: अंगदुखीचा खूप त्रास होऊ शकतो. खरेदी-विक्रीच्या कामात पैसे खर्च होतील. परिस्थिती तुमच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. पैशांच्या चणचणीमुळे घरात वाद होऊ शकतात. आई-वडिलांसोबतचे संबंध चांगले राहतील. प्रशासकीय कामात सहभागी होण्याची संधी मिळेल. आज कामात नक्की यश मिळेल. आज दिवसभर खूप मेहनत करावी लागू शकते. घरात डोकं शांत ठेवूनच वागा, शेजाऱ्यांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. धार्मिक चर्चेत तुम्ही पुढे राहाल. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगली प्रसिद्धी मिळू शकते.
मीन: वाहनात बसताना विशेष काळजी घ्या. आज पैसे कमवण्याची संधी चांगली आहे आणि आर्थिक प्रगतीही होईल. दिवसभर घरात शांतता असली तरी रात्रीच्या वेळी काहीतरी अशुभ घडू शकतं. आज दुसऱ्याच्या वस्तूची जबाबदारी घेऊ नका. आज एखाद्या वादात अडकण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी विनाकारण एखाद्या अडचणीत सापडू शकता. मुलांची चिंता सतावेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकता. मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी आजची वेळ शुभ आहे.