उन्हाळ्यातील अपचनाच्या समस्येपासून असे रहा दूर, वाचा घरगुती उपाय

Published : Mar 29, 2025, 11:41 AM IST
stomach pain and indigestion in summer must not be ignored know why

सार

Summer Acidity Problem Remedies : उन्हाळ्याच्या दिवसात अपचनाची समस्या होणे सामान्य बाब आहे.यावर काही घरगुती उपाय करू शकता.

Summer Acidity Problem Remedies : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्यानंतर आपल्या शरीरात बदल होऊ लागतात. यावेळी शरीरातून अत्याधिक घाम निघणे, खाण्यापिण्याबद्दल निष्काळजीपणा, डिहाइड्रेशन किंवा पोटासंबंधित समस्या उद्भवल्या जातात. खरंतर, उन्हाळ्याच्या दिवसात पचनक्रिया मंदावली जाते. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ पचण्यास वेळ लागतो. अशातच तुम्हाला उन्हाळ्यात सतत अपचनाचा त्रास होत असेल तर पुढील काही घरगुती उपाय करू शकता.

उन्हाळ्यात अपचनाची समस्या का वाढते?

उन्हाळ्यात शरीराला अत्याधिक पाण्याची गरज असते. पण पुरेशा प्रमाणात पाण्याचे सेवन न केल्यास पोटातील अ‍ॅसिडचे संतुलन बिघडले जाऊ शकते. यामुळे अ‍ॅसिडीची वाढली जाते. उन्हाळ्यात अत्याधिक तेलकट, मसालेदार पदार्थांचे सेवन केल्यानेही पोटासंबंधित समस्या उद्भवतात. काहीजण सकाळचा नाश्ता करत नाहीत. अथवा दीर्घकाळ उपाशी राहतात. यामुळे पोटात अ‍ॅसिडचे प्रमाण वाढले जाते. एवढेच नव्हे उन्हाळ्यात चहा-कॉफी, कोल्ड ड्रिंक्स किंवा सोड्याचे अत्याधिक सेवन केल्यानेही पोटात अ‍ॅसिडीची वाढली जाऊ शकते.

थंड दूध प्या

दूधामध्ये कॅल्शियम असते. यामुळे पोटातील अ‍ॅसिडला कमी करण्यास मदत करते. अपचनाची समस्या उद्भवली अशल्यास एक ग्लास थंड दूध प्या. यावेळी दूधामध्ये साखर घालू नका.

नारळाचे पाणी

नारळाचे पाणी शरीराला आतमधून थंडावा देण्यास मदत करते. याशिवाय पोटाला आरामही मिळेल. यामधील इलेक्ट्रोलाइट्स पोटासाठी फायदेशीर ठरतात. उन्हाळ्यात अपचनाची समस्या उद्भवत असल्यास दिवसातून दोनदा नारळ पाणी प्या.

बडीशेपचे पाणी

बडीशेपमध्ये अँटी-इंफ्लेमेंटरी आणि डाइजेस्टिव्ह गुणधर्म असल्याने पोटाला थंडावा मिळतो. याशिवाय अपचानाची समस्या दूर होण्यास मदत होते. यामुळे उन्हाळ्यातील अपचनाची समस्या दूर होण्यासाठी बडीशेपच्या पाण्याचे सेवन करू शकका.

लिंबू पाणी

लिंबू पाणी उन्हाळ्यातील अपचनाची समस्या दूर करण्यास मदत करेल. पोटातील अ‍ॅसिड संतुलित राखण्यास लिंबाचा रस फायदेशीर ठरतो. यासाठी कोमट पाण्यामध्ये लिंबाचा रस घालून दिवसातून दोनदा पिऊ शकता.

काकडी आणि कलिंगड खा

उन्हाळ्याच्या दिवसात शरीर हाइड्रेट राहण्यासाठी पाणीदार फळांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय अपचनाच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी काकडी आणि कलिंगड भरपूर खाऊ शकता.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

PREV

Recommended Stories

Aqua Workout : अ‍ॅक्वा वर्कआउट नक्की काय प्रकार आहे? वजन कमी करणे ते हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
Weekly Horoscope : चंद्र कर्क ते तूळ राशीत भ्रमण करेल, या लोकांसाठी आठवडा लाभदायी, तर या राशींनी रागावर नियंत्रण ठेवावे!