
Skin Care Tips : बिघडलेली लाइफस्टाइल आणि प्रदुषणासारख्या समस्यांच्या कारणास्तव बहुतांशजणांना त्वचेसंबंधित समस्या उद्भवली जाते. याशिवाय काहींना कमी वयातच त्वचेवर सुरकुत्या येऊ लागतात. अशातच ग्लोइंग त्वचेसाठी केवळ स्किन केअर रुटीनच नव्हे तर लाइफस्टाइलमध्येही काही बदल कारावा लागेल. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
हेल्दी ग्लोइंग स्किनसाठी काय करावे?
हेल्दी आणि ग्लोइंग त्वचेसाठी शरीराला आतमधून पोषण मिळणे अत्यावश्यक आहे. यासाठी हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करावी. याशिवाय काही वाईट सवयी सोडून चांगल्या सवयी लावाव्यात.
सकाळची चहा पिणे टाळा
हेल्दी त्वचेसाठी दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने करण्याएवजी 1 ग्लास पाण्याने करा. याशिवाय पुरेशी झोप घ्या. यामुळे त्वचा हाइड्रेट राहण्यास मदत होईल. शरीरामधील विषाक्त पदार्थ देखील बाहेर पडले जातील.
हेल्दी सीड्स आणि नट्सचे सेवन
त्वचेला आतमधून पोषण मिळण्यासाठी आणि ग्लो येण्यासाठी डाएटमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिडसारखे हेल्दी फॅट्सचा समावेश करावा. याशिवाय त्वचेसाठी व्हिटॅमिन ई युक्त बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बियांचे सेवन करावे. यामुळे त्वचेला नॅच्युरल ग्लो येण्यास मदत होते.
पोषण तत्त्वांनी समृद्ध डाएट
हेल्दी आणि ग्लोइंग त्वचेसाठी प्रोटीनयुक्त फूड्सचा डाएटमध्ये समावेश करावा. याशिवाय डाएटमध्ये प्रत्येक दिवशी अँटी-ऑक्सिडेंट्सयुक्त भाज्या आणि फळांचे सेवन करावे. लक्षात ठेवा, त्वचेसंबंधित समस्यांपासून दूर रहायचे असल्यास अनहेल्दी आणि जंक फूड्सचे सेवन करणे टाळा.
डीप ब्रीदिंग एक्सरसाइज करा
हेल्दी स्किनसाठी दररोज 5 मिनिटे डीप ब्रीदिंग एक्सरसाइज करा. यामुळे त्वचेला ऑक्सिजन मिळते आणि त्वचा नैसर्गिक रुपात चमकदार होते.
स्ट्रेंथ ट्रेनिंग करा
ग्लोइंग त्वचेसाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी आठवड्यात 100 मिनिटांपर्यंत स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकता. असे केल्याने शरीरातील ब्लड सर्कुलेशन व्यवस्थितीत होते. याशिवाय शरीर डिटॉक्स होण्यासह त्वचेला नैसर्गिक ग्लो येतो.
पुरेशी झोप घ्या
हेल्दी आरोग्यासाठी पुरेशी झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. अशातच ग्लोइंग आणि हेल्दी त्वचेसाठी पुरेशी झोप अत्यावश्यक आहे. यामुळे त्वचेमधील सेल्स रिपेअर होण्यास मदत होते. याशिवाय त्वचेसंबंधित समस्या असल्यास रात्रीच्या वेळेस चेहरा स्वच्छ धुवून मॉइश्चराइज करू शकता.
(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)