
Home Decor: घरी येऊनही मन प्रसन्न वाटत नाहीये का? याचं कारण तुमचं घर असू शकतं. जपानी कायझेन तत्त्वज्ञान सांगतं की मोठे बदल नाही, तर छोट्या छोट्या सवयींनीच घरात आनंदाचं संप्रेरक अँडोर्फिन वाढतं. जाणून घ्या ५ सोपे उपाय.
तुमचं घर तुमच्या मेंदूत अँडोर्फिनचं प्रमाण कमी करतंय का? जपानी तत्त्वज्ञान 'कायझेन'चा अवलंब करून घरात सुख शांती आणा. घर ही केवळ राहण्याची जागा नसून मानसिक शांती मिळवण्याचं ठिकाण आहे. मन प्रसन्न करण्यासाठी नेहमी बाहेर फिरायला जाणं किंवा महागड्या 'वेलनेस रुटीन'ची गरज नसते. घराची सजावट आणि रोजच्या सवयींमध्ये थोडेसे बदल केल्यास मन आनंदी ठेवणारे हॉर्मोन्स वाढू शकतात.
जपानी तत्त्वज्ञान कायझेन म्हणजे 'लहान लहान पण सतत सुधारणा'. या तत्त्वज्ञानानुसार घर सजवल्यास मेंदूतील कॉर्टिसोल कमी होतं आणि अँडोर्फिन, सेरोटोनिन वाढतं.
१. १ मिनिटाचा नियम: कायझेनचा मुख्य मंत्र - जे काम १ मिनिटात होऊ शकतं, ते लगेच करा. अंथरूण आवरणे, बूट जागी ठेवणे, बेसिन साफ करणे - हे काम पुढे न ढकलता लगेच करा. पसारा असलेला घर मेंदूवर ताण वाढवतो, तर आवरलेलं घर डोपामाइन वाढवतं.
२. 'मा' म्हणजेच मोकळी जागा ठेवा: जपानी लोक घरात मोकळ्या जागेला किंवा 'मा' ला खूप महत्त्व देतात. सर्व भिंती भरून टाकू नका. एक भिंत मोकळी ठेवा, जमिनीवरील अनावश्यक फर्निचर कमी करा. डोळ्यांसमोर मोकळी जागा असली की मन शांत राहतं.
३. पंच ज्ञानेंद्रियांना शांत करा: घरात मऊ प्रकाश, लाकडाचा हलका सुवास, लिनेन कपड्याचा स्पर्श असू द्या. प्रखर पांढऱ्या प्रकाशाऐवजी वॉर्म लाईट वापरा. निसर्गाचा स्पर्श - एक मनीप्लांट, लाकडी टेबल - अँडोर्फिन वाढवण्यास मदत करतो.
४. वाबी-साबी स्वीकारा: परफेक्ट नाही, तर अपूर्णताच सुंदर आहे. तडा गेलेल्या कपामध्ये झाड लावा, जुना लाकडी टेबल तसाच राहू द्या. सर्व काही परफेक्ट करण्याचा ताण कमी झाल्यावर मन हलकं होतं.
५. प्रवेशद्वार किंवा गेंकान स्वच्छ ठेवा: जपानमध्ये घराचा प्रवेशद्वार सर्वात महत्त्वाचा असतो. बूट विखुरलेले ठेवू नका. दारासमोर एक छोटं झाड, मऊ पायपुसणी ठेवा. घरात प्रवेश करताच मन प्रसन्न होईल.
घर बदलण्यासाठी लाखो रुपये लागत नाहीत, लागतात त्या फक्त रोजच्या छोट्या छोट्या कायझेन सवयी.