High Uric Acid Diet : युरिक अॅसिड वाढल्यास गाउट, सांधेदुखी व किडनी स्टोनसारखे त्रास होऊ शकतात. रेड मीट, सॉफ्ट ड्रिंक्स, अल्कोहोल आणि प्रोस्सेस्ड फूड यामुळे पातळी वाढते. हे पदार्थ टाळून आरोग्य राखा.
वाढलेल्या युरिक ॲसिडमुळे संधिवात, किडनी स्टोन होऊ शकतो. शरीर जास्त युरिक ॲसिड तयार करत असल्यास किंवा ते बाहेर टाकू न शकल्यास हायपरयुरिसेमिया होतो. यामुळे सूज आणि वेदना होतात.
28
संधिवात (Gout) सारख्या आरोग्य समस्या होऊ शकतात
जेव्हा शरीर जास्त युरिक ॲसिड तयार करते किंवा ते पुरेसे बाहेर टाकत नाही, तेव्हा ते रक्तात जमा होते. याला हायपरयुरिसेमिया म्हणतात. यामुळे सांध्यांमध्ये युरिक ॲसिडचे कण जमा होऊन संधिवात (Gout) होतो.
38
युरिक ॲसिडची पातळी वाढवणारे पाच पदार्थ
किडनी स्टोन टाळण्यासाठी युरिक ॲसिडची पातळी कमी करणे महत्त्वाचे आहे. नॅशनल किडनी फाउंडेशननुसार, युरिक ॲसिडचे कण किडनी स्टोन तयार करतात, ज्यामुळे तीव्र वेदना होतात. मग कोणते पदार्थ टाळावेत?
बीफ, मटण आणि डुकराचे मांस यांसारख्या रेड मीटमध्ये प्युरिनचे प्रमाण जास्त असते. शरीरात याचे विघटन होऊन युरिक ॲसिड तयार होते. रेड मीटचे सेवन कमी केल्यास युरिक ॲसिड नियंत्रणात राहते.
58
सी-फूडमुळे युरिक ॲसिडची पातळी वाढू शकते
काही सी-फूडमुळे युरिक ॲसिडची पातळी वाढू शकते. सी-फूड आरोग्यदायी असले तरी, काही माशांमध्ये प्युरिनचे प्रमाण जास्त असल्याने युरिक ॲसिड वाढते. कोळंबी, खेकडा आणि शिंपल्यांमध्ये पारा जास्त असतो.
68
साखरयुक्त पेये पिणे टाळा
सोडा आणि गोड पेयांमध्ये आढळणारे हाय-फ्रक्टोज कॉर्न सिरप युरिक ॲसिडची पातळी वाढवू शकते. त्यामुळे साखरयुक्त पेये पिणे कमी करा.
78
प्रक्रिया केलेले पदार्थ युरिक ॲसिड वाढवू शकतात
प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने युरिक ॲसिडची पातळी वाढू शकते. कारण त्यात साखर आणि अनहेल्दी फॅट्स असतात, ज्यामुळे मेटाबॉलिझम संबंधित समस्या निर्माण होतात.
88
जास्त फॅटचे दुग्धजन्य पदार्थ युरिक ॲसिड वाढवतात
जास्त फॅट असलेले दुग्धजन्य पदार्थ युरिक ॲसिड वाढवू शकतात. दुग्धजन्य पदार्थ फायदेशीर असले तरी, जास्त फॅटच्या पदार्थांमध्ये प्युरिनचे प्रमाण जास्त असते. क्रीम आणि काही प्रकारचे चीज युरिक ॲसिड वाढवतात.