Recipe : तयार करा मखाणा सलाड, आरोग्याला हितकारक

Published : Dec 17, 2025, 05:35 PM IST
Healthy Makhana Salad

सार

एशियानेट न्यूज ऑनलाइनवर यावेळी वेगवेगळ्या प्रकारच्या सलाड रेसिपी दिल्या जातात. आता आपण आरोग्यासाठी पौष्टिक अशा मखााणा सलाडची रेसिपी पाहणार आहोत. ही बनवण्यास अतिशय सोपी अशी डिश आहे. 

औषधी गुणधर्म असलेल्या मखाणाचा वापर नाश्त्यासाठी तसेच यापासून खीर रायता, करी आणि इतर पदार्थ बनविण्यासाठी केला जातो. याला इंग्रजीत फॉक्सनट किंवा लोटस सीड्स असे म्हटले जाते. याची शेती प्रामुख्याने उत्तर भारतात केली जाते. मखाणात मोठ्या प्रमाणात पौष्टिक तत्वे आढळतात. देशभरात मखाणापासून विविध पदार्थ बनविले जातात. आज आपण या मखाणापासून सलाड बनविण्याची सोपी पद्धत पाहाणार आहोत. एकदा करून पाहा हा पौष्टिक पदार्थ -

 

लागणारे साहित्य

मखाणा                                              दोन कप

लिंबाचा रस                              दोन चमचे

भाजलेले शेंगदाणे                  अर्धा कप

काळी मिरी पावडर                  एक चमचा

मीठ                                              अर्धा चमचा

बारीक चिरलेला कांदा            अर्धा कप

बारीक चिरलेला टोमॅटो          अर्धा कप

 

तयार करण्याची पद्धत

सर्वप्रथम मखाणा हलका गरम करून घ्या. त्यानंतर त्यात भाजलेले शेंगदाणे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, काळी मिरी पावडर, लिंबाचा रस आणि मीठ घाला. थोडे ऑलिव्ह ऑइल घालून सर्व साहित्य चांगले मिक्स करा. आपले हेल्दी सलाड तयार आहे.

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

लग्नामध्ये दिसा सर्वात हटके! बन हेअरस्टाईल सजवण्यासाठी वापरा 'या' ७ सुंदर ॲक्सेसरीज
मंगळसूत्र असो वा चैन, हे पेंडेंट वाढवेल तुमची शोभा! पाहा १८ कॅरेट सोन्याचे सर्वात लेटेस्ट डिझाइन्स