उपवासावेळी करू नका या 5 चुका, बिघडेल आरोग्य

Mistakes During Vrat : उपवासावेळी आपण काही अशा चुका करतो ज्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊया उपावासावेळी केणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर...

Mistakes During Vrat : हिंदू धर्मात सण-उत्सावावेळी बहुतांशजण उपवास ठेवतात. उपवास करणे धार्मिकच नव्हे वैज्ञानिक दृष्टीकोनातून अत्यंत लाभदायक मानले जाते. उपवासावेळी काही गोष्टी लक्षात ठेवल्यास शरीर डिटॉक्स होण्यासही फायदा होऊ शकतो. पण काहीजण उपवासावेळी काही अशा चुका करतात ज्यामुळे आरोग्य बिघडले जाऊ शकते. उपवासावेळी मर्यादित प्रमाणात पदार्थांचे सेवन केले जाते. पण काहीजण अज्ञातपणे उपवासावेळी असे पदार्थ खातात ज्याचा आरोग्यवर प्रभाव पडला जातो. जाणून घेऊया उपवासावेळी कोणत्या चुका करू नयेत याबद्दल सविस्तर...

फळांसोबत दूधाचे पदार्थ
उपवासावेळी काहीजण मिल्क शेक अथवा फळांसोबत दह्याचे सेवन करतात. यामुळे पोट बिघडण्याची शक्यता वाढली जाते. डेयरी प्रोडक्ट्समध्ये उच्च प्रमाणात फॅट्स आणि प्रोटीन असतात. यामुळे फळ आणि डेयरी प्रोडक्ट्स एकत्रितपणे पचण्यास वेळ लागतो. फळांमध्ये असलेले अ‍ॅसिड्स आणि एन्जाइम्स दूधासोबत पचनक्रियेवर प्रभाव पाडतात. यामुळे पचनक्रिया बिघडली जाऊ शकते. यावेळी पोट दुखी, गॅस अशा समस्या उद्भवू शकतात.

संध्याकाळी फळांचे सेवन
आयुर्वेदानुसार, सुर्यास्तापूर्वी कच्चे अन्नपदार्थ खाणे टाळावे. असे पदार्थ शरिरास पचनास कठीण जाते. सॅलड, फळ अथवा अर्धवट शिजवलेल्या भाज्यांचे सेवन करणे टाळावे. अन्यथा ब्लोटिंगची समस्या होऊ शकते. उपवासावेळी फळांचे सेवन करणार असल्यास सकाळी 12 ते दुपारी 4 वाजेपर्यंत करावे. संध्याकाळी 4 नंतर फळांचे सेवन करू नये.

तळलेले पदार्थांचे सेवन करणे टाळा
उपवासावेळी काहीजण तेलात तळलेल्या पदार्थांचे सेवन करणे टाळा. यावेळी चिप्स, पुरी अथवा तळलेले पदार्थ खाल्ल्याने शरिरात फॅट्स वाढू शकतात. अत्याधिक प्रमाणात तळलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने हृदयासंबंधित आजारांचा धोका वाढला जातो. यामुळे उपवासावेळी तळलेले पदार्थ खाणे टाळा.

अत्याधिक गोड पदार्थांचे सेवन
उपवासावेळी मिठाई किंवा साखरेपासून तयार केलेले पदार्थ अत्याधिक खाऊ नयेत. यामुळे आरोग्य बिघडले जाऊ शकते. वजन वाढण्यासह शरिरातील इंसुलिनचे प्रमाण वाढू शकते. उपवासावेळी मिठाईएवजी गुळापासून तयार करण्यात आलेल्या पदार्थांचे सेवन करावे.

थोड्या-थोड्या वेळाने खावे
उपवासावेळी भूकेवर अधिक लक्ष दिले जाते. यामुळे थोड्या-थोड्या वेळाने खावे. काहींना तहान लागली तरीही भूक लागल्यासारखे वाटते आणि भोजन करतात. यामुळे उपवासावेळी पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे. हर्बल टी उपवासावेळी पिऊ शकता.

उपवासावेळी या चुका करणे टाळा

  1. उपवासावेळी खूप वेळ उपाशी राहणे टाळा.
  2. तणावाखाली असल्यास उपावस करणे टाळावे.
  3. पुरेशा प्रमाणत झोप घ्या. जेणेकरुन उपवासावेळी थकवा जाणवणार नाही.

आणखी वाचा : 

Janmashtami 2024 : बाळगोपाळला सजवण्यासाठी वस्रांचे पाहा खास डिझाइन

वय आणि उंचीनुसार किती असावे वजन? असा जाणून घ्या BMI

Share this article