Hair Spa at Home : घरच्याघरी कमी खर्चात करा पार्लरसारखा हेअर स्पा, जाणून घ्या सोप्या स्टेप्स

Published : Dec 15, 2025, 01:45 PM IST

Hair Spa at Home : पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा करण्याएवजी तुम्ही घरच्याघरी करू शकता ते सुद्धा अगदी कमी खर्चामध्ये. अशातच हेअर स्पा करण्यासाठी कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्यात हे जाणून घेऊ.

PREV
15
हेअर स्पा का करावा?

केस कोरडे, रफ, गळणारे किंवा निर्जीव झाले असतील तर बहुतांश जण पार्लरमध्ये हेअर स्पा करून घेतात. मात्र वारंवार पार्लरमध्ये जाणे खर्चिक ठरू शकते. अशा वेळी घरच्याघरी कमी खर्चात पार्लरसारखा हेअर स्पा करणे हा उत्तम पर्याय आहे. योग्य स्टेप्स फॉलो केल्यास केसांना पोषण मिळते, टाळू स्वच्छ होते आणि केस मऊ, चमकदार बनतात. नियमित घरगुती हेअर स्पामुळे केस गळणे, कोंडा आणि कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.

25
घरच्याघरी करा हेअर स्पा

घरगुती हेअर स्पाची पहिली आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे तेल मसाज. नारळ तेल, बदाम तेल किंवा ऑलिव्ह तेल कोमट करून टाळूवर हळुवारपणे मसाज करा. मसाज करताना बोटांच्या टोकांनी गोलाकार हालचाली करा, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या मुळांना पोषण मिळते. इच्छित असल्यास तेलात थोडेसे एरंडेल तेल किंवा व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळू शकता. मसाज केल्यानंतर 10–15 मिनिटे गरम टॉवेलने केस गुंडाळा, यामुळे तेल आतपर्यंत मुरते.

35
हेअर वॉश आणि डीप क्लिनिंग

दुसरी स्टेप म्हणजे हेअर वॉश आणि डीप क्लिनिंग. गरम टॉवेलनंतर सौम्य, सल्फेट-फ्री शॅम्पूने केस धुवा. टाळू स्वच्छ करण्यावर भर द्या आणि केसांवर जास्त घासू नका. गरज असल्यास एकदाच शॅम्पू वापरा, कारण जास्त वेळा शॅम्पू केल्याने केस कोरडे होऊ शकतात. शॅम्पूनंतर केसांमधील अतिरिक्त पाणी हलक्या हाताने काढा.

45
हेअर मास्क लावा

तिसरी आणि सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे हेअर मास्क किंवा कंडिशनिंग. घरच्या घरी पार्लरसारखा परिणाम मिळवण्यासाठी केळी, दही आणि मध यांचा मास्क खूप फायदेशीर ठरतो. हे मिश्रण केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत लावा. हा मास्क 15–20 मिनिटे ठेवा आणि पुन्हा गरम टॉवेलने केस झाका. यामुळे केसांना खोलवर पोषण मिळते, कोरडेपणा कमी होतो आणि नैसर्गिक चमक येते.

55
योग्य पद्धतीने केस सुकवा

शेवटची स्टेप म्हणजे रिलॅक्सेशन आणि योग्य ड्रायिंग. मास्क धुतल्यानंतर थंड किंवा कोमट पाण्याने केस स्वच्छ करा. केस घासून पुसण्याऐवजी टॉवेलने हलक्या हाताने दाबून पाणी काढा. शक्यतो हेअर ड्रायर टाळा आणि केस नैसर्गिकरित्या सुकू द्या. आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसांतून एकदा हा घरगुती हेअर स्पा केल्यास केस निरोगी, मजबूत आणि चमकदार राहतात.

Read more Photos on

Recommended Stories