Hair Care Tips: पांढऱ्या केसांची समस्या कमी करण्यासाठी शॅम्पूमध्ये नेमकं कोणतं तेल मिसळावं? कलौंजीचं तेल वापरण्याची योग्य पद्धत कोणती आणि त्याचे फायदे काय आहेत? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
पांढरे केस कधीही न सांगता अचानक दिसायला लागतात. सुरुवातीला ते केसांमध्ये लपलेले असतात, पण समोर दिसू लागल्यावर चिंता वाढते. मग आपण हेअर डाय, कलर शॅम्पू किंवा महागड्या ट्रीटमेंट्सचा आधार घेतो. पण यामुळे केसांचं नुकसान होतं आणि पैसेही खर्च होतात. मात्र, वेळेवर लक्ष दिल्यास पांढरे केस येण्यापासून रोखता येतात आणि त्यांची वाढही कमी करता येते. यासाठी शॅम्पूमध्ये फक्त एक तेल मिसळायचं आहे. चला, त्याबद्दल जाणून घेऊया.
25
कलौंजीचं तेल
शॅम्पू करण्यापूर्वी त्यात कलौंजीचं तेल (Black Seed Oil) मिसळा आणि मग केसांसाठी वापरा. हे तेल केसांची काळजी घेण्यासाठी शतकानुशतके वापरले जात आहे. हे तेल केस रंगवण्याचं काम करत नाही, तर स्काल्प (टाळू) आणि केसांच्या मुळांना पोषण देतं.
35
कलौंजीच्या तेल स्काल्प निरोगी ठेवते
जेव्हा केसांमध्ये नैसर्गिक पिगमेंट (रंगद्रव्य) तयार होणं कमी होतं, तेव्हा पांढऱ्या केसांची समस्या वाढते, असं मानलं जातं. तणाव, सूज, पोषणाची कमतरता आणि स्काल्पचं आरोग्य बिघडणं ही देखील याची कारणं असू शकतात. कलौंजीच्या तेलातील अँटीऑक्सिडंट्स आणि फॅटी ॲसिड स्काल्पला निरोगी ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे नवीन येणारे केस चांगल्या प्रतीचे असू शकतात.
तुमच्या नेहमीच्या वापराएवढा शॅम्पू हातावर घ्या. त्यात कलौंजी तेलाचे 2 ते 4 थेंब टाका. दोन्ही गोष्टी व्यवस्थित एकत्र करून स्काल्प आणि केसांच्या मुळांना लावा. 1 ते 2 मिनिटं तसंच राहू द्या आणि मग नेहमीप्रमाणे केस धुवा. लक्षात ठेवा, तेल थेट शॅम्पूच्या अख्ख्या बाटलीत मिसळू नका, कारण त्यामुळे उत्पादन खराब होऊ शकतं.
55
आठवड्यातून करा 2 ते 3 वेळा हा उपाय
चांगल्या परिणामांसाठी, आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा उपाय करू शकता. कोणताही बदल जाणवण्यासाठी किमान 4 ते 6 आठवडे लागू शकतात, कारण केसांची वाढ हळूहळू होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कलौंजीचं तेल पांढऱ्या केसांना एका रात्रीत काळं करत नाही. पण नियमित वापराने केस मजबूत, मऊ आणि कमी कोरडे होऊ शकतात. काही लोकांच्या मते, यामुळे पांढऱ्या केसांची चमक कमी होऊन ते इतर केसांमध्ये अधिक सहजपणे मिसळून जातात.