केसांना सिल्की आणि स्मूथ बनवण्यासाठी महागडी उत्पादनं नको. घरातच तुम्ही नारळाच्या दुधाचा वापर करून केस सुंदर आणि निरोगी बनवू शकता.
नारळाच्या दूधात असे अनेक पोषक घटक असतात, जे केसांच्या वाढीसाठी मदत करतात. यामुळे केसांना चांगलं पोषण मिळतं.
¼ कप नारळाचं दूध गरम करा. ते कोमट झाल्यावर स्कॅल्पवर लावा आणि 10 मिनिटं मसाज करा. नारळाचं दूध नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करतं.
20 मिनिटांनंतर, सौम्य शाम्पूने केस धुवा. चांगल्या परिणामांसाठी, आठवड्यातून एकदा हा उपाय नक्की करा.
एका भांड्यात चार चमचे नारळाचं दूध आणि दोन चमचे लिंबाचा रस घ्या. हे मिश्रण एकत्र करून चार तास फ्रिजमध्ये ठेवा.
हा पॅक केसांना आणि स्कॅल्पला लावा. 45 ते 50 मिनिटं तसंच ठेवा. त्यानंतर केस धुवा आणि मग सौम्य शाम्पूने पुन्हा एकदा केस स्वच्छ करा.
एका भांड्यात तीन चमचे नारळाचं दूध, एक चमचा कोरफड जेल आणि मूठभर तुळशीची पानं एकत्र करून मिश्रण बनवा. हा पॅक केसांना चांगला लावा.
जोडव्यांचे हे डिझाइन्स वाढवतील पायांची शोभा, पाहूनच पडाल प्रेमात
Home Gardening: घरात झाडं लावण्याचे 'हे' आहेत 6 जबरदस्त फायदे...
Health Alert: शरीर डिहायड्रेट झालंय? वेळीच ओळखा ही 5 लक्षणं, करा उपचार
Cleaning Tips: शर्टच्या कॉलरवरचा काळा मळ या सोप्या टिप्सनी असा करा साफ