Monsoon Hair Care : पावसाळ्यात केसांची अशी घ्या काळजी, Hair Fall पासून रहाल दूर

Published : Jun 23, 2026, 02:49 PM IST

Hair Care : पावसाळ्यातील वातावरण दमट असते. याचा केसांवर परिणाम होऊ शकतो. केसांमधून निघणारा घाम, पावसाचे पाणी यामुळे केस ओलसर होतात. अशातच केसगळती, कोंड्याची समस्या आणि केस तुटणे अशा समस्या वाढल्या जातात.  

PREV
14
ओलसर केसांची काळजी

पावसाच्या पाण्याने केस भिजल्यास ते वेळीच धुणे गरजेचे आहे. केस ओलसर ठेवल्यास त्यामध्ये बुरशी किंवा इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढली जाते. यामुळे पावसाळ्यात दोन ते तीन वेळा केस धुवू शकता. यावेळी केमिकल फ्री शॅम्पूचा वापर करा.

24
केसांना तेल लावा

पावसाळ्यात केसांना नियमित तेल लावू शकता. यामुळे केस हेल्दी राहण्यास मदत होते. यासाठी खोबरेल तेल, बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑइलने केसांना हलक्या हाताने मसाज करू शकता. यामुळे रक्ताभिसरण सुधारले जाते. केसांची मूळ मजबूत होतात. प्रोटीन्स व्हिटॅमिन ई, बायोटीन आणि लोहयुक्त फूड्सचा आहारात समावेश करणे केसांसाठी फायदेशीर ठरू शकते.

34
ओलसर केस बांधणे टाळा

अनेकजण ओले केस लगेच बांधतात किंवा ड्रायरचा जास्त वापर करतात. यामुळे केस अधिक तुटू शकतात. केस मोकळे ठेवून सुकवू शकतात. तसेच स्ट्रेटनर, कर्लर आणि इतर हीट स्टायलिंग प्रोडक्ट्सचा वापर कमी करा. जेणेकरुन केसांचे नुकसान होणार नाही.

44
होममेड हेअरमास्क

दही, अ‍ॅलोव्हेरा, मेथी आणि अंड्यापासून बनवलेला होममेड हेअरमास्कचा वापर करू शकता. यामुळे केसांना नॅच्युरली पोषण मिळते. आठवड्यातून एकदा हेअर मास्क लावू शकता. यामुळे केस कोरडे होण्याची शक्यता दूर होते. केस अधिक मऊसर आणि चमकदार दिसतात.

(Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories