Mumbai : पावसाळ्यात बऱ्याच महिलांना केसगळतीची अधिक समस्या निर्माण होते. यावर कितीही ट्रिटमेंट केल्या तरीही काही होत नाही. अशातच घरगुती उपायांनी केसगळतीच्या समस्येपासून दूर राहू शकता. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
पावसाळा म्हटलं की गारवा, हिरवाई. पण या ऋतूत केसांची सर्वात मोठी समस्या म्हणजे केसगळती. वातावरणातील आर्द्रतेमुळे टाळूवर बुरशीचा प्रादुर्भाव होतो, केस थोडे ओले राहिले तरी झपाट्याने गळायला लागतात. त्यामुळे पावसाळ्यात केसांची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. बाजारातील महागडे प्रॉडक्ट्स वापरण्याऐवजी आपण घरगुती नैसर्गिक उपाय वापरल्यास केसांची गळती कमी होऊ शकते आणि केस अधिक मजबूत, निरोगी बनतात.
26
कांद्याचा रस
कांद्याचा रस केस गळतीसाठी खूप प्रभावी आहे. कांदा बारीक करून त्याचा रस काढा आणि टाळूवर लावा. १५–२० मिनिटांनी केस धुवा. कांद्यामधील सल्फर केसांच्या वाढीस पूरक असतो आणि मुळांपर्यंत पोषण पोहोचवतो.
36
मेथीचा मास्क
मेथी ही केसगळती रोखण्यासाठी रामबाण उपाय आहे. २ टेबलस्पून मेथीची बी ५–६ तास भिजवून ठेवा. नंतर ती वाटून पेस्ट तयार करा व ही पेस्ट टाळूवर लावा. ३०–४५ मिनिटे ठेवून केस सौम्य शॅम्पूने धुवा. मेथीमध्ये प्रथिने आणि निकोटिनिक अॅसिड असल्याने ती केसांची मुळे बळकट करते.
अंड्यामध्ये प्रथिने भरपूर असतात. एका अंड्याचा पांढरा भाग घेऊन त्यात अर्धा लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण केसांवर लावून ३० मिनिटे ठेवा. नंतर शॅम्पूने धुवा. यामुळे केसांना पोषण मिळते आणि गळती कमी होते.
56
आंब्याची कोवळी कोवळी पाने आणि कढीपत्ता
आंब्याची पाने, कढीपत्ता आणि नारळाचे तेल एकत्र गरम करा. हे तेल थोडं थंड झाल्यावर टाळूवर लावा. आठवड्यातून २ वेळा हा उपाय केल्यास केसांची गळती कमी होऊन नवीन केस उगवण्यास मदत होते.
66
आंबट दह्याचा उपयोग
दही हे केसांसाठी उत्तम नैसर्गिक कंडीशनर आहे. १ कप दही घेऊन त्यात लिंबाचा रस मिसळा आणि हे मिश्रण टाळूवर व केसांवर लावा. ३० मिनिटांनी सौम्य शॅम्पूने केस धुवा. दह्यामुळे टाळूतील जंतू नष्ट होतात आणि केस मुळांपासून मजबूत होतात.