Guru Purnima 2025 : गुरुपौर्णिमेची तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व घ्या जाणून

Published : Jul 07, 2025, 12:19 PM IST
Guru Purnima 2024

सार

Guru Purnima 2025 : गुरू पौर्णिमेचा दिवस ज्ञान आणि श्रद्धेचा मानला जातो. या दिवशी महर्षी वेदव्यास यांची जयंती देखील असते. गुरू पौर्णिमेच्या दिवशी गुरूप्रति सन्मान, पूजा आणि आभार मानण्याचा दिवस आहे. यंदा गुरू पौर्णिमा कधी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या. 

Guru Purnima 2025 : हिंदू संस्कृतीत गुरूचे स्थान अत्युच्च मानले गेले आहे. "गु" म्हणजे अंधकार आणि "रु" म्हणजे प्रकाश. गुरू म्हणजे अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा. अशा गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा. हा दिवस शिष्य आणि गुरू यांच्यातील नात्याची आठवण करून देतो.

गुरू पौर्णिमा तिथी 2025

आषाढ महिन्याती पौर्णिमा तिथीची सुरुवात 10 जुलैला रात्री 01 वाजून 37 मिनिटांनी होणार असून समाप्ती 11 जुलैला रात्री 02 वाजून 07 मिनिटांनी संपणार आहे. अशातच 10 जुलैला गुरू पौर्णिमा साजरी केली जाणार आहे.

गुरू पौर्णिमा 2025 शुभ मुहूर्त

  • ब्रम्ह मुहूर्त : सकाळी 4.10 ते 4.50 वाजेपर्यंत
  • अभिजीत मुहूर्त : सकाळी 11.59 ते दुपारी 2.54 वाजेपर्यंत
  • विजय मुहूर्त : दुपारी 12.45 ते 3.40 वाजेपर्यंत
  • गोधूलि मुहूर्त : संध्याकाळी 7.21 ते 7.41 वाजेपर्यंत

या दिवशी गुरूपूजन, व्यासपूजन, ध्यान, दान आणि ज्ञानार्जन याचे विशेष महत्त्व आहे.

गुरुपौर्णिमेचे महत्त्व:

गुरुपौर्णिमा ही व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. याच दिवशी *महर्षी वेदव्यासांचा* जन्म झाला होता, ज्यांनी वेदांचे विभागीकरण करून मानवजातीला महान ज्ञान दिले. त्यामुळे याला व्यासपौर्णिमा म्हणतात.गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य आपल्या गुरूंची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतात. हा दिवस आत्मपरिक्षण, साधना आणि आत्मशुद्धीचा दिवस मानला जातो.

या दिवशी काय करावे? 

  • गुरूपूजन करतात
  • गुरूंच्या पायावर फुलं, हार अर्पण करतात
  • गुरूंचे उपदेश ऐकतात
  • ध्यान व आत्मचिंतन करतात
  • साधू-संतांना दान देतात

योग मार्गावर चालणाऱ्या साधकांसाठी गुरुपौर्णिमा अत्यंत महत्त्वाची आहे. भगवान शिवाने आदियोगी म्हणून सप्तर्षींना योगाचे पहिले शिक्षण याच दिवशी दिले, असे मानले जाते. त्यामुळे ही योगाचा आरंभदिवस देखील मानली जाते. याशिवाय आधुनिक काळात गुरू म्हणजे केवळ अध्यात्मिक किंवा शाळेतील शिक्षकच नाही, तर **आयुष्याला दिशा देणारे कोणीही** असू शकतात – आई-वडील, मित्र, शिक्षक, मार्गदर्शक. या दिवशी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून जीवनात प्रकाश टाकणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान केला जातो.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

घराची शोभा वाढवतील ही ५ रंगीबेरंगी पानांची इनडोअर रोपे, हिवाळ्यात घरात करा लागवड
Weight Loss : वजन कमी करणे होणार सोपे, ओझेम्पिक औषध भारतात लाँच