
Nano Banana : आजकाल सोशल मीडियावर ३D डिजिटल फिगरचा ट्रेंड आहे. सेलिब्रिटी आणि राजकारणींसह सर्वजण याचा वापर करत आहेत. अलीकडेच आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी AI टूल वापरून फोटो पोस्ट केला होता, जो लोकांना खूप आवडला. जर तुम्हालाही असा फोटो बनवायचा असेल तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही टूल्स वापरून थ्री डी पिक्चर कसे तयार करू शकता. ही पद्धत अतिशय सोपी आहे. तुम्ही काही मिनिटांत ही इमेज तयार करु शकता.
अलीकडेच, Google Gemini मध्ये एक नवीन फीचर जोडण्यात आले आहे ज्याचे नाव Gemini 2.5 Flash Image आहे. सर्वसाधारणपणे याला “Nano Banana” असेही म्हटले जाते. हे AI टूल कोणताही फोटो काही सेकंदात ३D मॉडेलमध्ये बदलते आणि ते सामान्य फोटोपेक्षा खूप वेगळे दिसते. लक्षात ठेवा की हे फीचर वापरण्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. हे पूर्णपणे मोफत आहे.
हेही वाचा - Google Gemini चं नवं AI इमेज एडिटर Nano Banana, तु्म्ही हे सोपे 15 प्रॉम्प्ट्स ट्राय केले का?
ChatGPT प्रमाणे Google Gemini हा एक AI प्लॅटफॉर्म आहे, जो Google Research च्या मदतीने तयार करण्यात आला आहे. येथे टेक्स्ट, इमेज आणि व्हिडिओ तयार केले जाऊ शकतात. याशिवाय अभ्यास ते ऑफिसच्या कामात याचा वापर करता येतो. हे फोन आणि डेस्कटॉप दोन्ही ठिकाणी वापरले जाते.